शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बदलाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 04:46 IST

देशात अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी चांगले चालक महत्त्वाचे आहेत. त्याकरिता नवे दोन हजार ड्रायव्हिंग सेंटर सुरू केले जाणार असून, त्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

नवी मुंबई : देशात अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी चांगले चालक महत्त्वाचे आहेत. त्याकरिता नवे दोन हजार ड्रायव्हिंग सेंटर सुरू केले जाणार असून, त्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. देशभरातील वाहतूकदारांकरिता वाशी येथे आयोजित ‘प्रवास २०१७’ या कार्यक्रमप्रसंगी ते उपस्थित होते. या वेळी वाहन परमिटकरिता आरटीओमार्फत होणारी चाचणी रद्द केल्याचीही घोषणा त्यांनी केली.देशापुढे प्रदूषणाची गंभीर समस्या असून, अपघातांचे प्रमाण कमी करण्याचेही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यावर परिणामकारक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याने, यामध्ये काळाप्रमाणे सुधारणा करण्याची गरज केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. नवा मोटार अ‍ॅक्ट मंजूर झाल्यास, दळणवळण क्षेत्रातील हे बदल पाहायला मिळणार आहेत. अपघात टाळण्यासाठी मार्गांवर आवश्यक तिथे पूल, भुयारी मार्ग उभारण्यात आले आहेत. यानंतरही घडणाºया अपघातांना अप्रशिक्षित चालक कारणीभूत आहेत. देशात खासगी क्षेत्रात सुमारे २२ लाख चालकांची आवश्यकता आहे. चांगल्या प्रशिक्षित चालकांची ही कमतरता भरून काढण्यासाठी, २ हजार ड्रायव्हिंग सेंटर सुरू केले जाणार आहेत. या केंद्राद्वारे पूर्णपणे संगणकाद्वारे चालकाची चाचणी घेतली जाणार असून, अवघ्या तीन दिवसांत चालक परवाना मिळणार आहे. यामुळे आरटीओमधील भ्रष्टाचाराला आळा बसणार असून, चालकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी कामचलाऊ चालकांना घेण्याऐवजी प्रशिक्षित, शिस्तप्रिय चालकांना नोकरीवर ठेवल्यासही अपघात कमी होतील, असेही ते म्हणाले.प्रदूषण टाळण्यासाठी व इंधन वाचविण्यासाठी डिझेलऐवजी बायोगॅस, मिथेनवर चालणाºया बसला प्राधान्य दिले जाणार आहे. अशा बस बनविण्यासाठी देशातील कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी केले. त्याशिवाय इलेक्ट्रिक बस, कार, मोटारसायकल यांचाही वापर वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशातील कचरा बायोगॅस निर्मितीसाठी वापरल्यास, कचरा व इंधन दोन्हीचे प्रश्न मिटणार आहेत. येत्या काळात देशात १२ महामार्ग होणार असून, त्यामुळे दिल्लीतल्या वाहतूककोंडीचाही तिढा सुटणार आहे.वाहनांना बसवलेल्या स्पीड गव्हर्नन्समध्ये सुधार करून, वेगमर्यादा ८० ऐवजी १२० केली जाणार आहे. मात्र, त्याकरिता वाहने चांगल्या दर्जाची वापरावीत, असा सल्ला गडकरी यांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना दिला. चांगले रस्ते बनविल्यानेही काही जण नाराज होतात. काही अधिकारी व नेते यांनाही प्रतिवर्षी रस्त्यावर खड्डे हवे असतात. मात्र, त्यांचा विचार न करता, संपूर्ण रस्ते काँक्रीटचे करून मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न मिटवून आवश्यक तिथे चार किंवा सहा लेन केले जाणार आहेत. यामुळे दोन वर्षांत अांतरराष्टÑीय दर्जाचे मार्ग पाहायला मिळणार आहेत.कार्यक्रमाला पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राजस्थानचे मंत्री युनुस खान, स्वतंत्रदेव सिंह, प्रसन्ना पटवर्धन, आमदार मंदा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.जल, रेल्वे वाहतुकीला प्राधान्य देणारयेत्या काळात जल वाहतुकीला व रेल्वे वाहतुकीला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानुसार, मुंबईत ७५० क्रुझ दाखल होणार असून, नवे क्रुझ टर्मिनसदेखील तयार केले जाणार आहे. त्याशिवाय, महत्त्वाच्या अनेक शहरांमध्ये सीप्लेन सुविधा सुरू करण्याचाही आपला प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी सांगितले. त्याशिवाय मुंबईमधून रोरो सर्व्हिस सुरू केली जाणार असून, त्याद्वारे मुंबई ते नेरळ १४ मिनिटांत तर मुंबई ते मांडवा १८ मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे.महामार्गांलगत ७५० रोड साइट अ‍ॅमिनिटी सुरू केल्या जाणार आहेत. त्या ठिकाणी लांबच्या प्रवाशांना उद्यान, दुकाने व हॉटेल अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. याची निविदा लवकरच निघणार असून, त्यामध्ये ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी पुढाकार घेण्याचा सल्ला गडकरी यांनी दिला.त्याशिवाय सुरत, बडोदा व अहमदाबाद या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर बस पोर्ट केले जाणार असून, त्यानंतर देशभरात दोन हजार बस पोर्ट सुरू केले जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.