पुणे : मैत्रीचे नाटक करून लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाला अटक केली. आरोपीला १४ मेपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याच आदेश दिला.अमित जगदिशसिंग गुलेरिया (वय २७, रा. हिमाचलप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना २९ जानेवारी २०११ ते २८ मार्च २०१३ रोजी नगर रस्त्यावर घडली. याप्रकरणी सव्वीस वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी ही पुण्यात शिक्षण घेत असताना आरोपीने अनकेदा फोनवर संपर्क साधून तिच्याशी मैत्रीचे नाटक केले व त्यानंतर तिच्याशी लग्न करण्याचे तिला आमिष दाखविले आणि तिच्यावर बलात्कार केला.
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
By admin | Updated: May 9, 2014 22:20 IST