शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

महापालिका टोचणार रेल्वेचे कान

By admin | Updated: August 5, 2016 22:21 IST

गुरुवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी मुंबईची जीवनवाहिनी विस्कळीत झाली. अनेक भागांमध्ये रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यामुळे रेल्वे सेवेला ब्रेक लागला.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ५ : गुरुवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी मुंबईची जीवनवाहिनी विस्कळीत झाली. अनेक भागांमध्ये रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यामुळे रेल्वे सेवेला ब्रेक लागला. पावसाळ््यापूर्वी रेल्वे रुळालगतचे छोटे नाले साफ करण्यासाठी पालिकेने कोटयवधी रुपये दिले होते. मात्र त्यानंतरही दरवर्षी प्रमाणे यंदा हेच चित्र असल्याने पालिका आता रेल्वेचे कान टोचणार आहे.गुरुवारी रात्रीपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सकाळी मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते. पालिकेचे दावे फोल ठरवत सखल भाग पाण्याखाली गेला. मात्र पाणी साठल्याचा सर्वाधिक फटका रेल्वे वाहतुकीला बसला. विशेषत: मध्य रेल्वेची वाहतुकही काही तासांसाठी ठप्पच होती. सायन, कुर्ला, माटुंगा, सँडहर्स्ट रोड, मस्जिद बंदर येथील रेल्वे रुळ पाण्याखाली गेले होते.या प्रकरणाची पालिकेने गंभीर दखल घेतली आहे. शहरातील आपत्कालीन नियोजनाची जबाबदारी पालिकेकडे आहे. रेल्वेच्या हद्दीतील छोटे नाल्यांच्या साफसफाईसाठी पालिका रेल्वेला ठराविक रक्कम देत असते. मात्र वांरवार सुचना देवूनही रेल्वे हे छोटे नाले साफ केल्याचा भास निर्माण करते. प्रत्यक्षात पावसाळ््यात रेल्वेच्या साफसफाईची पोलखोल होत असल्याची नाराजी पालिकेच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.....................पालिका पाठवणार रेल्वे प्रशासनाला पत्र पालिका प्रशासन रेल्वे प्रशासनाला याप्रकरणी खरमरीत पत्र लिहणार आहे. पावसाळ््यात रेल्वे रुळावर साचलेल्या पाण्याची नोंद घेण्यात आली आहे. ही निरीक्षणे पत्राद्वारे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहेत. या वृत्ताला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.