शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

रेबीजमुळे मृत्यू वाढले

By admin | Updated: May 20, 2016 01:26 IST

शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली

पुणे : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जानेवारीपासून आतापर्यंत ९ रुग्णांचा रेबीजने मृत्यू झाला आहे. इतक्या कमी कालावधीत होणारे मृत्यू धोकादायक असून, महापालिका या समस्येकडे कितपत गांभीर्याने पाहते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या ५० हजारांच्या घरात पोचली आहे. महापालिकेतर्फे यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असली तरीही ती पुरेशी नाही. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि महापालिकेत या कामासाठी असणारे अपुरे मनुष्यबळ यामुळे या समस्येवर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला अपयश येत असल्याचे दिसते. परिणामी चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच ५३१३ व्यक्तींना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. तर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मासिक आकडेवारीनुसार पुण्यात दर महिन्याला एक ते दीड हजार नागरिक भटक्या कुत्र्यांच्या दहशतीला बळी पडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. चालू वर्षी पुणे शहरात जानेवारी - ३, मार्च -४, एप्रिल - १ व चालू मे महिन्यात १ असे एकूण ९ रुग्णांचा रेबीजने मृत्यू झाला आहे. जानेवारीत १,७२८, फेब्रुवारीत १,९१७ नागरिकांना, तर मार्चमध्ये १,६६८ नागरिकांना कुत्री चावली आहेत. गेल्या काही वर्षांपासून शहरात भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा आलेख वाढला आहे. गेल्या वर्षभरात शहरात तब्बल १८,५६७ नागरिकांना कुत्र्यांच्या चाव्याचा सामना करावा लागला आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. यामध्ये प्रीव्हेन्शन आॅफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल्स अ‍ॅक्ट १९६०, अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल (डॉग) रुल्स २००१, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम (बीपीएससी अ‍ॅक्ट) ६४ नुसार रेबीज प्रतिबंधात्मक उपचार देणे, बीपीएमपी अ‍ॅक्ट ६६ (२४) नुसार रेबीज झालेल्या कुत्र्यांना ठार मारण्यात येते. तसेच पालिकेच्या कुत्रा बंदोबस्त विभागामार्फत शहरातील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांवर कारवाई केली जाते. त्यासाठी चारही झोनमध्ये महापालिकेच्या ४ गाड्या आहेत. प्रत्येक गाडीने दिवसाला २० कुत्री पकडली जातात. त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करून रेबीज प्रतिबंधात्मक लस देण्यात येते. त्यानंतर नियमानुसार पुन्हा पकडलेल्या ठिकाणीच सोडण्यात येते.पालिकेकडून अशापद्धतीने कुत्र्यांचे निर्बीजीकरण होत असले, तरी प्रत्यक्ष कुत्र्यांची संख्या म्हणावी तितकी कमी झालेली नाही. त्यामुळे कुत्र्यांचा चावा नागरिकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे दिसते. २०१२च्या एका अहवालानुसार, भारतात किमान २० हजार रेबीजची प्रकरणे समोर येतात तर, मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. >शहरातील भटक्या कुत्र्यांची ठोस आकडेवारी सांगता येत नसली तरी रस्त्यांवर ५० हजारांहून अधिक भटकी कुत्री असल्याचा अंदाज आहे. त्या तुलनेत कुत्र्यांच्या होणाऱ्या नसबंदी शस्त्रक्रियांची संख्या खूपच कमी असल्याचे दिसते. गेल्या वर्षभरात ११ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले आहे. ही निबीर्जीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर करण्याची आवश्यकता आहे. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे ते शक्य होत नसल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे.