जळगाव : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘धग’ या मराठी चित्रपटाचे निर्माते व वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी विशाल पंडित गवारे (४१) यांचे शुक्रवारी रात्री चाळीसगाव येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आजीच्या अंत्यसंस्कारासाठी ते चार- पाच दिवसांपासून गावी आले होते. शुक्रवारी रात्री ते मित्र परिवारासह कन्नडकडून चाळीसगावकडे येत होते. रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांना रस्त्यात अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना रात्री त्यांचे निधन झाले. वरखेडे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)
‘धग’चे निर्माते विशाल गवारे यांचे निधन
By admin | Updated: May 22, 2016 03:58 IST