शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अकरावीपासूनच करावा लागणार नीट, जेईईचा सराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 03:55 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रश्नपत्रिकांमध्ये केलेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांचा नीट, जेईईच्या सरावाला इयत्ता अकरावीपासूनच

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रश्नपत्रिकांमध्ये केलेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांचा नीट, जेईईच्या सरावाला इयत्ता अकरावीपासूनच सुरुवात होणार आहे. मंडळाने पहिल्यांदाच इयत्ता बारावीसह अकरावीचा आराखडा तयार करताना घटकनिहाय गुण निश्चित केले आहेत. तसेच प्रश्नांची काठीण्यपातळीही बारावीप्रमाणेच ठरविण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत अकरावीला फारसे महत्त्व न देणारे विद्यार्थी व शिक्षकांचाही कस लागणार आहे.राज्यातील विद्यार्थ्यांना नीट, जेईई या देशपातळीवरील प्रवेश परीक्षांना सामोरे जाता यावे, यासाठी राज्य मंडळाने इयत्ता अकरावी व बारावीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित व संख्याशास्त्र या चार विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदलला आहे. इयत्ता अकरावीसाठी सुरू शैक्षणिक वर्षापासून तर बारावीसाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून सुधारित आराखडा लागू होणार आहे. सुधारित आराखड्यामध्ये मंडळाने प्रश्नपत्रिकेची संपूर्ण रचना बदलली आहे. प्रश्नांची संख्या, त्यांचे गुण, घटकनिहाय प्रश्न, घटकनिहाय गुण, प्रश्नांना दिले जाणारे पर्याय यामध्ये कमी-अधिक प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. हा आराखडा अकरावी व बारावीसाठी सारखाच असणार आहे.चारही विषयांची काठीण्यपातळी जवळपास सारखीच ठेवण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांचे विषय ज्ञान, त्याची समज, सूत्र व संकल्पनांचा उपयोग करण्याची क्षमता या बाबी तपासल्या जाणार असून त्यासाठी गुण निश्चित करण्यात आले आहेत. यावर्षीपासून अकरावीला हा नवीन आराखडा लागू होणार आहे. प्रत्येक घटकाचा त्यानुसार विचार करावा लागणारआतापर्यंत केवळ बारावीसाठीच घटकनिहाय गुण निश्चित केले जात होते. सुधारित आराखड्यामध्ये अकरावीलाही हे गुण निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करताना प्राध्यापकांना प्रत्येक घटकाचा त्यानुसार विचार करावा लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही या घटकांचा अभ्यास करावा लागेल. त्यामुळे यापुढे कोणताही घटक बाजुला ठेवता येणार नाही. तसेच प्रश्नांची काठीण्यपातळीही जेईई व नीटप्रमाणे असेल. यामुळे अकरावीपासूनच विद्यार्थ्यांची नीट व जेईईची तयारी होण्यास सुरुवात होणार आहे.- पाठ्यपुस्तकातील कोणत्याही घटकांसाठी स्वतंत्र भाग दिला जाणार नाही. मात्र बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू), एका वाक्यात उत्तरे (व्हीएसए), थोडक्यात उत्तरे १ (एसए १) आणि थोडक्यात उत्तरे २ (एसए २) तर सविस्तर उत्तर (एलए) असे प्रश्ननिहाय चार भाग करण्यात आले आहे. यामध्ये कोणत्याही घटकातील प्रश्न कोणत्याही भागात असू शकतो. प्रत्येक भागासाठी गुणही निश्चित करण्यात आले आहेत. प्रश्नांना दिलेले जाणारे पर्याय कमी करण्यात आले असून एका प्रश्नाला केवळ एकच पर्यायी प्रश्न दिला जाईल.- आतापर्यंत प्रश्नपत्रिकेचे दोन भाग केले जात होते. भाग १ मध्ये ठराविक घटकांवरील प्रश्न व भाग २ मध्ये इतर घटकांवरील प्रश्न दिले जात होते. आता ही पद्धत बंद करण्यात आलेली आहे.राज्य मंडळाने अकरावी व बारावीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये केलेले बदल सकारात्मक आहेत. नीट व जेईईला सामोरे जाण्यासाठी हा आराखडा योग्य असून त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितपणे फायदा होईल. विशेषत: अकरावीसाठी प्रत्येक घटकनिहाय निश्चित करण्यात आलेले गुण महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्राध्यापकांना त्यानुसारच प्रश्नपत्रिका काढावी लागेल. पुर्वी अनेकदा काही घटक वगळले जात होते.- प्रा. किरण खाजेकर, अध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालयीन रसायनशास्त्र शिक्षक संघटना