शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

...तर पीएमपी दिवाळखोरीत!

By admin | Updated: August 23, 2016 01:05 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रायव्हेट लिमिटेडला (पीएमपीएमएल) अपेक्षित प्रवासीवाढ न मिळाल्यास दिवाळखोरीच्या दारात घेऊन जाण्याची भीती व्यक्त केली

पुणे : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या गोंडस नावाखाली पीएमपीएमएलसाठी नवीन १५५0 बस घेण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रायव्हेट लिमिटेडला (पीएमपीएमएल) अपेक्षित प्रवासीवाढ न मिळाल्यास दिवाळखोरीच्या दारात घेऊन जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या चार वर्षांत प्रवासीवाढीचा आलेख घसरत असताना आणि त्यातच दैनंदिन खर्च भागविण्यासाठी पीएमपीला अपेक्षित उत्पन्न मिळत नसतानाच, नवीन बससाठी पीएमपीला दरवर्षी तब्बल १00 ते १२0 कोटी रुपयांचा बँकेचा हप्ता भरावा लागणार आहे. त्यामुळे नवीन बस येऊनही प्रवासीसंख्या न वाढल्यास पीएमपीला प्रत्येक वर्षी ३00 ते ३५0 कोटींची तूट सोसावी लागणार असल्याचा प्रशासनाचाच प्राथमिक अंदाज आहे.>उत्पन्न जाणार बँकेचे हप्ते भरण्यातपीएमपीच्या ताफ्यात सध्या २0७५ बस आहेत. त्यातील सरासरी १४४७ बसच २0१५-१६ या आर्थिक वर्षात रस्त्यावर होत्या. या बससाठी पीएमपीला प्रत्येक महिन्यात कर्मचारी वेतन, देखभाल दुरुस्ती तसेच इतर सर्व खर्च धरून ७७ कोटी रुपयांचा खर्च येतो. त्यात आणखी १५५0 बस वाढल्यास या बस नवीन असल्याने तसेच देखभाल दुरुस्तीचा खर्च कमी असल्याने त्या बसचा ४५ कोटींचा खर्च वाढणार आहे. तसेच बँकेचा हप्ता १0 कोटींनी वाढेल. म्हणजेच पीएमपीला दर महिन्याचा खर्च ११५ ते १२0 कोटींच्या आसपास जाईल. सध्या पीएमपीला दर महिन्यास तिकीट विक्रीतून ४0 ते ४५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. समजा तेवढीच प्रवासीवाढ गृहीत धरल्यास हे उत्पन्न ९0 कोटींच्या आसपास जाईल. मात्र, त्यानंतर दर महिन्याला पीएमपीवर तब्बल २५ ते ३0 कोटींच्या तोट्याचा भार पडणार आहे. त्यातच १५५0 बसमधील ९00 बस या बाजारातून कर्ज घेऊन खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी 540 कोटींचा खर्च आहे. तर ही कर्जाची रक्कम 7 वर्षात परतफेड करायची असल्याने दरवर्षी साडेदहा टक्के व्याजदर गृहीत धरल्यास सुमारे 120 कोटी रूपये बँकेला मोजावे लागणार आहेत.

>प्रवासीसंख्येचे ‘कागदी इमले’

ही बस खरेदी करण्यासाठी पुणे महापालिकेने तयार केलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्याचा आधार घेण्यात आला आहे. २00७-0८ मध्ये असलेला १७ टक्के सार्वजनिक वाहतुकीचा वापर २0१६-१७ मध्ये २५ टक्के करण्यासाठी एकूण प्रतिदिन प्रवासीसंख्या १९.५0 लाख असणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात ती १२ लाखांच्या आसपास आहे. त्यामागे बसची संख्या अपुरी असल्याचा निष्कर्ष आहे. हे २५ टक्के उद्दिष्ट साध्य करायचे असल्यास पीएमपीकडे ३३१८ बस असणे आवश्यक आहे. तर सध्या केवळ १४५0 बसच रस्त्यावर धावत आहेत. नेमका हाच धागा पकडून १५५0 बसच्या खरेदीचा निर्णय पुढे आला आहे. पण प्रत्यक्षात ही अपेक्षित प्रवासीवाढ कागदी इमलाच ठरणार आहे. कारण गेल्या चार वर्षांत पीएमपीची प्रवासीसंख्या ५0 हजारांनी घटलेली असल्याचे पीएमपीची आकडेवारीच सांगते. २0१२-१३ मध्ये १२ लाख ८ हजार, २0१३-१४ मध्ये ११ लाख ६४ हजार, २0१४-१५ मध्ये १२ लाख १७ हजार तर १५-१६ मध्ये ही प्रवासीसंख्या ११ लाख २४ हजारांवर आली आहे. त्यामुळे १५00 बस वाढल्या तरी या संख्येत नेमकी किती वाढ होईल हे सांगता येत नाही. तसेच प्रवासीसंख्या घटण्यामागे बस हे एकमेव कारण नसून, सातत्याने वाढते तिकीट दर, खराब बस, कोलमडते वेळापत्रक अशा अनेक घटकांचा समावेश आहे. नवीन बस आल्या तरी जुन्या बसच्या या समस्या कायम राहणार आहेत. त्यामुळे १२ लाखांची प्रवासीसंख्या ७ लाखांनी वाढेल की नाही, याबाबत पीएमपी प्रशासनच साशंक आहे.>तोट्याचा भार पालिकांवरचपीएमपीच्या २0१५-१६ च्या लेखापरीक्षण अहवालानुसार, १४६४ बस मार्गावर असताना पीएमपीला ७७६ कोटींचे उत्पन्न मिळाले असून, ९२८ कोटींचा खर्च आलेला आहे. तर बसची संख्या दुप्पट झाल्यास देखभाल दुरुस्ती वगळता कर्मचारी वेतन, इंधन तसेच इतर खर्चही दुपटीने वाढणार आहे. तर देखभाल दुरुस्तीच्या खर्चाची जागा बँकेचे हप्ते घेणार आहेत. म्हणजे प्रवासीसंख्या १९ लाखांवर गेली तरी उत्पन्न हे १५00 कोटींच्या घरात जाईल. मात्र त्याच वेळी खर्च १८00 ते १९00 कोटींच्या घरात जाणार आहे. म्हणजेच पुढील सात ते आठ वर्षे संचलन तूट ३00 ते ३५0 कोटींच्या घरात जाईल. ही तूट भरून देण्याची जबाबदारी दोन्ही महापालिकांवर आहे. त्यामुळे सध्या १६0 कोटी तूट देणाऱ्या महापालिकांना नवीन बसच्या खरेदीनंतर ४00 कोटींची तूट पीएमपीला मोजावी लागेल. ही तूट प्रवासी दुप्पट झाल्यावर येणारी आहे. मात्र, अपेक्षित प्रवासीसंख्या न वाढल्यास ती ५00 कोटींच्या घरातही जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.>हा बसखरेदीचा निर्णय आत्मघातकी आहे. बस वाढवून प्रवासीसंख्या वाढणार नाही. या खरेदीचा सर्व बोजा पीएमपीवर येईल. सध्या पगार द्यायला, सीएनजीचे पैसे द्यायला पैसे नसताना हा खरेदीचा घाट घालणे पूर्णत: चुकीचे आहे. त्यामुळे दिवाळखोरी निश्चित आहे. त्यामुळे ही खरेदी केवळ हितसंबंधी व उखळ पांढरे करण्यासाठीच आहे. सध्या पार्किंगसाठी जागा नाही आणि नवीन बस कोठे लावणार आहे, त्याचे नियोजन नाही. तर दुसरीकडे डेपोसाठी पालिकाही जागा देत नाहीत. त्यामुळे ही खरेदी तातडीने थांबविणे आवश्यक आहे. त्यामुळे नियोजन करून टप्प्या-टप्प्याने बसखरेदी करणेच सयुक्तिक होईल.- जुगल राठी (अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच)