शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

महापालिकेचा ३४ गावांसाठी दोन हजार कोटींचा आराखडा

By admin | Updated: June 2, 2014 22:45 IST

राज्य शासनाच्या अध्यादेशाद्वारे महापालिकेत नव्याने ३४ गावांचा समावेश केला.

- रस्ते, पाणी, कचरा व सांडपाणी सुविधांना प्राधान्य पुणे : राज्य शासनाच्या अध्यादेशाद्वारे महापालिकेत नव्याने ३४ गावांचा समावेश केला. त्याठिकाणी रस्ते, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रियेला प्राधान्य देण्यात येणार आहे. समाविष्ट गावांमध्ये मूलभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाने अंदाजे २००० कोटींचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिका हद्दीत नव्याने २८ गावांचा समावेश करण्याचा निर्णय ऑक्टोंबर २०१२ मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला. मात्र, त्यानंतर नगर विकास खात्याने महापालिकेकडून अभिप्राय मागितला होता. त्यावर महापालिकेने आणखी ६ गावांचा समावेश करण्याविषयी अनुकूल अभिप्राय पाठविला होता. त्यानुसार नगर विकास खात्याने एकूण ३४ गावांचा समावेश करण्याचा २९ मे रोजी घेतला. पुढील महिन्याभरात निर्णयावर हरकती-सूचना शासनाने मागविल्या आहेत. दरम्यान, महापालिकेने समाविष्ट होणा-या गावांतील सद्यस्थितीतील सुविधा व संभाव्य सुविधांचे सर्व्हेक्षण सुरू केले. संबंधित गावांचा महापालिकेचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. तसेच, गावांमध्ये ७४ हजार चौरस मीटरचे रस्ते विकसित करण्यासाठी १५७३ कोटी ६१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच, पाणी पुरवठा सुविधांसाठी ८६ कोटी ६८ लाख, ड्रेनेज व सांडपाणी व्यवस्थेसाठी १६९ कोटी ३० लाख आणि कचरा वाहतूक-प्रक्रियेसाठी ८ कोटी ६२ लाख रुपयांचे अंदाजे खर्चाचा आराखडा महापालिका प्रशासनाकडून तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. समाविष्ट ३४ गावांसाठी अंदाजे खर्च रस्ते सुविधा : १५७३ कोटी पाणी पुरवठा : ८६ कोटी सांडपाणी व्यवस्था : १६९ कोटी कचरा व्यवस्थापन : ८ कोटी इतर आवश्यक सुविधा : १५० कोटी