आळंदी : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी जागाच्या कल्याणासाठी शांतीचा जो मार्ग दाखविला त्याचा जगभर प्रसार व्हावा. माऊलींनी समाजाला सन्मार्गाला लावले; म्हणूनच संत नामदेव यांचे उर्वरित मोठे जीवन पंजाबसारख्या ठिकाणी व्यतीत झाल्याने शीख समाज आजही त्यांची पूजा बांधीत आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आळंदी येथे व्यक्त केले.
स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोगमहाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक इमारतीचा वास्तुशांती व उद्घाटन सोहळा पवार यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते. प. पू. मारुतीमहाराज कु:हेकर अध्यक्षस्थानी होते.
या कार्यक्रमाला आळंदीचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, उपाध्यक्षा अंजना कु:हाडे, खेडचे आमदार दिलीप मोहिते, आमदार बापूसाहेब पठारे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे, माजी आमदार उल्हास पवार, सूर्यकांत पलांडे, अॅड. रामभाऊ कांडगे, विजय कोलते, किरण मांजरे, प्रकाश म्हस्के, डॉ. विश्वनाथ कराड, उद्योगपती प्रताप खांडेभराड, माजी नगराध्यक्ष बबनराव कु:हाडे, विलास कु:हाडे, आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश कु:हाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षा विमल ठाकूर, बाबासाहेब ठाकूर, नंदकुमार मुंगसे, वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त भालचंद्र नलावडे, आजी-माजी विद्यार्थी, आळंदी ग्रामस्थ, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रंतील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
खेडचे आमदार दिलीप मोहिते म्हणाले, ‘‘1917मध्ये आळंदी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना झाली असून, 1992मध्ये शरद पवार यांनी दिलेल्या प्रेरणोने 11 लाख रुपये देणगी दिली होती. ती रक्कम बँकेत ठेवली व त्याचे 45 लाख रुपये जमा झाल्यानंतर ही भव्य इमारत उभी राहिले आहे.
या प्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, ह.भ.प. आयुव्रेदाचार्य फरशीवाले बाबा, किशोरजी व्यास, ह.भ.प. मारुतीमहाराज कु:हेकर यांची भाषणो झाली. भालचंद्र नलावडे यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेतर्फे शरद पवार यांचा शाल, श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आलेल्या मान्यवरांचा वारकरी शिक्षण संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
भालचंद्र नलावडे यांनी प्रास्ताविक केले. सुनील थिगळे यांनी सूत्रसंचालन केले. दिनकर शास्त्री यांनी आभार मानले. (वार्ताहर)
वारकरी संप्रदायात राहून महाराष्ट्रातील बळीराजाने अन्नधान्य उत्पादनामध्ये उच्चांक गाठल्यामुळे आज जगातील 17 ते 18 देशांना आपण अन्नधान्य पुरवितो. बळीराजाची सेवा करण्याची संधी केंद्रीय कृषिमंत्री म्हणून मिळाली, याचा आनंद आहे. जगातील शांततेसाठी आज भागवत संप्रदायातील विचारांचा प्रचार आणि प्रसार जगभर झाला, तर गाझापट्टीत हमाससारख्या ठिकाणी मनुष्यबळी नाहक गेले नसते.
- शरद पवार,
अध्यक्ष, राष्ट्रवादी
4शरद पवार यांनी ब:याच वर्षानंतर आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. देवस्थानातर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.