एनएसईएल घोटाळा जिग्नेश शहांकडे चौकशी सुरूमुंबई- नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड(एनएसईएल) घोटाळयाचा कट कोणी रचला, त्यात कोण कोण सहभागी होते, या कंपनीचे उत्पन्न आणि व्यवसाय कसा काय वाढला, याबाबत अटक आरोपी जिग्नेश शहा यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी कसून चौकशी करत आहेत. ५६०० कोटींच्या एनएसईएल घोटाळयाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शहा यांच्यासह एकूण अकरा आरोपींना अटक केली आहे. शहा हे एनएसईएलचे प्रमुख आहेत. दोन दिवसांपुर्वी त्यांना अटक करण्यात आली. ६ जानेवारी रोजी आर्थिक गुन्हे शाखेने या घोटाळयाप्रकरणी एमपीआयडी कायद्यानुसार सुमारे दहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केलेले आहे.
एनएसईएल घोटाळा : जिग्नेश शहांकडे चौकशी सुरू
By admin | Updated: May 9, 2014 22:53 IST