रोटी, कपडा, मकान याप्रमाणोच आता इंटरनेट ही आजच्या तरुणाईची मूलभूत गरज झालीय. खाता-पिता, उठता-बसता कॉलेजिअन्सच्या हातात स्मार्ट फोन्स असतोच. ‘गुगल बाबा की जय..’ म्हणत दिवसभर सोशल मीडियाशी कनेक्ट राहिलेल्या या कॉलेजिअन्सला इंटरनेटचा कंटाळाही येत नाही. याउलट हे ‘नेट’चि माङो घर म्हणत दिवस-रात्र स्मार्ट फोन्सच्या स्क्रीनला चिकटून राहणंच ही पिढी पसंत करतेय. ‘स्टे कनेक्टेड’ म्हणत 247 इंटरनेटवर सर्फिग करणा:या या नेटिझन्सला 29 ऑक्टोबर रोजी असणा:या ‘इंटरनेट डे’बद्दल ‘युवागिरी’च्या टीमने बोलते केलेय..
ऑनलाइन शॉपिंग, गेम्स, गाइड्स अॅप यामुळे आमचं ‘जगणं’ सहज- सोप्पं झालंय. सगळा जमानाच ‘टेक्नोसॅव्ही’ झाल्यामुळे काही सेकंदात जगाच्या कानाकोप:यातील बित्तंबातमी नेटिझन्सकडे आपसूकच येते. त्यामुळे समाजाकडे आमचं लक्ष नाहीय, असं म्हणणा:यांना काही मिनिटांत ‘निभर्या’साठी उभारलेला लढा असो वा दाभोलकरांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या चळवळीची आठवण ही पिढी करून देतेय.
एकीकडे ‘ऑकुर्ट’सारखी सोशल साइट्स बंद होत असताना दुसरीकडे व्हाईबर, व्हीचॅट, हाइक, स्काइप, लाइन या नवनव्या साइट्स डोकं वर काढतायत. त्यामुळे आम्हाला आधीच्या पिढीपेक्षा ‘अॅडव्हान्स’ ऑप्शन्स मिळतात. मग इंटरनेटपासून दूर का जायचं? यापेक्षा ‘सर्फिग’ आणि ‘चॅटिंग’ला लिमिट ठेवून याच विश्वात जगणं हा आमचा अधिकारच आहे, हे ही पिढी सांगायला विसरत नाही. कॉलेजच्या नोट्स असो, प्रॉक्सी असो वा घरची कामं या स्मार्ट फोन्समुळे सगळंच एका ‘क्लिक’वर होतंय. त्यामुळे कॉलेजिअन्सचं विश्व नेटपल्याड उरलंच नाहीये.
नेट म्हणजे माझा ‘ऑक्सिजन’च. कुठेही, कधीही मोबाइलशिवाय जमतच नाही. त्यामुळे एक दिवस जरी नेट डाऊन असेल तर बोअर होतं. जगाच्या कुठल्याही कोप:यात कनेक्ट राहण्याचा हा एकच बेस्ट ऑप्शन आहे, सो विदाऊट इंटरनेट नही चलेगा..
-श्वेता फणसे, आरमिट महाविद्यालय
इंटरनेटमुळे सगळं जग जवळ आलंय. स्मार्ट फोन्समुळे कोणतीही गोष्ट अध्र्या रात्रीही पाहिजे असेल तर नेटशिवाय ऑप्शन्स नसतोच. पण ‘नेट’ची सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे सातासमुद्रापलीकडे असणारे सगळे फ्रेंड्स, रिलेटिव्हस् दूर असूनही जवळ आलेयत.
- सोनाली पेंडुलकर, कीर्ती महाविद्यालय
स्मार्ट फोन्स हेच जग झालंय. त्यात व्हॉट्सअॅप, फेसबुकमुळे एकाच ग्रुपवर वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं मांडणं. एखाद्या चांगल्या कामासाठी एकत्र येणं हेसुद्धा नेटमुळेच शक्य होतं. त्यामुळे नेटचे तोटे आहेत, पण दृष्टिकोन बदलला तर फायदाच आहे.
- अंकित देसाई, कीर्ती महाविद्यालय
शॉपिंगसाठी इंटरनेट सर्फिग हा बेस्ट ऑप्शन्स आहेत. त्यामुळे काही सेकंदातच अवघ्या जगाशी कनेक्ट राहता येतंय, मग इंटरनेट हे ‘बेस्टच’ आहे, पण त्यात अडकून न राहता आपल्या आजूबाजूच्या संवेदशनील जगाशी रिलेशन ठेवायलाच पाहिजे.
- राहुल लोखंडे, रुईया महाविद्यालय
नेट सर्फिगशिवाय जमतच नाही. रोज नवीन साइट्स चेक करणं, ऑनलाइन शॉपिंगच्या ट्रेंड्समध्ये अपडेट राहणं खूप आवडतं. त्यामुळे इंटरनेट तो जान है यार.!
- विक्रांत जाधव, रुईया महाविद्यालय
इंटरनेटमुळे हवी असणारी माहिती एका क्षणात मिळवता येते. इंटरनेटमुळे वेळेला फार महत्त्व आले आहे. इंटरनेटमुळे कामे चटकन व वेळेत होतात, मग नेटपासून दूर का जायचं. या नेटमुळे सगळेच एका क्लिकवर एकाच वेळी कनेक्ट होऊ शकतात. सो गाइज.. हॅप्पी टू बी कनेक्ट..!
- राहुल चौगुले,
रुईया महाविद्यालय
नेटचा कधी तरी कंटाळा येतो, पण नेटशिवाय जगणं बाप रे.. हा विचारही नकोसा वाटतोय. याच नेटमुळे तर अनेक गोष्टी काही सेकंदातच शक्य होतात. सगळी कामंही भरभर होतात, सो ‘नेट’ हा बेस्ट फ्रेंड आहे
- अक्षय जाधव, सेंट्रल रेल्वे महाविद्यालय
चॅटिंगसाठी नेट हाच पर्याय. दिवस-रात्र मित्रंशी कितीही अगदी ‘अनलिमिटेड’ बोलता येतं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. शिवाय, छोटी-छोटी कामं एका क्लिकवर करणं शक्य झालंय, यामुळे वेळही वाचतो.
- करिश्मा कांबळे,
एसआयडब्ल्यूएस महाविद्यालय
इंटरनेट युझर्स दिवसेंदिवस वाढतायत. यामुळे वेळ वाचवून कामं पटापट करता येतात. शिवाय चॅटिंग, सर्फिग, शॉपिंग सगळंच एका क्लिकवर. मग नेटपासून लांब जाणं शक्य आहे का.. त्यामुळे नेटचे भाव वाढले तरी स्टे कनेक्टेड..
- विनेश खराडे, आयडियल इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्चर
‘अनलिमिटेड’ चॅटिंग करताना, सोशल मीडियावर रिअॅक्ट होणं यातून आमच्यासारखे कॉलेजिअन्स एकदम फास्ट समाजाशी कनेक्ट राहतायत. त्यामुळे ‘इंटरनेट डे’ही आता आम्ही सेलीब्रेट करणार असून याच्याही शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाच वापरणार आहोत.
- प्रसाद कामटेकर, रुईया महाविद्यालय