विवेक चांदूरकर - अकोला
बनावट बियाणांच्या माध्यमातून होणारी शेतक:यांची फसवणूक रोखण्यासाठी बियाणो पेरणीपूर्वीच तपासण्याची पद्धत, अकोलास्थित कृषी विज्ञान केंद्राने विकसित केली आहे.
अमरावती विभागातील आत्महत्याग्रस्त पाच जिल्ह्यांत, गत काही वर्षात कपाशीला मागे टाकून सोयाबीन हे मुख्य पीक बनले आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी बनावट बियाणो शेतक:यांच्या माथी मारले जात आहे. परिणामी पेरणी केल्यावर बियाणो उगवलेच नसल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यामुळे शेतक:यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत असून, दुबार पेरणीचे संकट ओढवून शेतकरी उद्ध्वस्त होत आहे.
आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतक:यांचे नुकसान रोखण्यासाठी, अकोलास्थित कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (कृषी विद्या) डॉ. जीवन रामभाऊ कतोरे आणि कार्यक्रम समन्वयक डॉ. उमेश ग. ठाकरे यांनी पेरणीपूर्वीच बियाणो तपासण्याची पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये कागदाचा उपयोग करावयाचा झाल्यास, बिया गुंडाळलेला कागदाचा गुंडाळा प्लास्टिकच्या तुकडय़ामध्ये गुंडाळून सावलीत ठेवावा लागतो, तर गोणपाटाचा वापर केल्यास, दोन-तीन दिवस गोणपाटावर थोडे-थोडे पाणी टाकावे लागते.
4कृषी विकास केंद्राने विकसित केलेल्या पद्धतीमध्ये उगवणशक्ती तपासण्यासाठी कागद किंवा गोणपाटाचा वापर केला जातो. कागदाचा वापर करण्यासाठी उगवणक्षमता तपासण्यासाठी प्रयोगशाळेत वापरला जाणारा कागद किंवा वर्तमानपत्रचा कागद वापरता येऊ शकतो.
4कागद वा गोणपाट ओला करून, त्याच्या घडय़ा घालून प्रत्येक घडीमध्ये प्रत्येकी दहा बिया गुंडाळून, कागद वा गोणपाट सावलीमध्ये ठेवणो आणि चार दिवसांनंतर हळुवार हाताने घडय़ा उघडून मोड आलेल्या सशक्त रोपांची संख्या मोजणो, अशा स्वरूपाची ही सोपी पद्धत आहे.
4शंभर बियांपैकी जेवढय़ा बियांना मोड येतील, तेवढे टक्के बियाण्याची उगवणक्षमता असे समजण्यात येते.