शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

पर्यायी विषयांची आवश्यकता नाही

By admin | Updated: September 20, 2016 01:27 IST

राज्यातील दहावीच्या इंग्रजी आणि गणित विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

पुणे : राज्यातील दहावीच्या इंग्रजी आणि गणित विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यातच एकाही विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवर नापास शेरा येणार नसल्याचे राज्य शासनाने अध्यादेश काढून प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित व इंग्रजी विषयासाठी पर्याय देण्याची खरंच गरज आहे का? तसेच विद्यार्थ्यांना केवळ पास करायचे आहे, की घडवायचे आहेत, असा प्रश्न तज्ज्ञांंकडून उपस्थित केला जात आहे. राज्य मंडळाच्या निकालाची टक्केवारी गेल्या काही वर्षांपासून वाढत चालली आहे. विद्यार्थ्यांना ८०/२० पॅटर्नमुळे गुणांची खिरापत वाटली जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने जुलै महिन्यातच पुरवणी परीक्षा घेतली जात आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी वाढविण्यासाठी हे निर्णय घेतले जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यामुळे गुणवत्तावाढीकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. दहावीमध्ये गणित विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०१३ नंतर दुपटीने कमी झाली आहे. मार्च २०१६ च्या परीक्षेत १५ लाख ९९ हजार २३२ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ८७ हजार १७० विद्यार्थी गणित विषयात नापास झाले. तर इंग्रजी विषयाची परीक्षा दिलेल्या १४ लाख ३८ हजार ९०६ विद्यार्थ्यांपैकी १ लाख १९ हजार २२३ विद्यार्थी नापास झाले. त्यातील काही विद्यार्थ्यांनी जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेत नापास झालेल्या विषयांची परीक्षा दिली. त्यामुळे या दोन विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, असे म्हणता येणार नाही. विद्यार्थ्यांना दहावीपासूनच पर्यायी विषय निवडण्याची संधी दिली तर नापास होण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थी गणित व इंग्रजी विषय घेणार नाहीत. दहावीमध्ये विद्यार्थी सर्व विषयांत परिपक्व होतातच असे नाही. पुढील काळात विद्यार्थ्यांची विज्ञान, वाणिज्य आदी शाखेतील प्रवेशाची दारे बंद होतील. त्यामुळे पर्यायी विषय देण्याचा निर्णय घेऊ नये, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)>गेल्या पाच वर्षात इंग्रजी विषयात ६९ लाख ९५ हजार १११ विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ८१ हजार ८८८ विद्यार्थी नापास झाले, तर गणित विषयाच्या ७७ लाख ४३ हजार ४१२ पैकी २ हजार १६0 विद्यार्थी नापास झाले. >आपल्याला विद्यार्थी घडवायचे आहेत की केवळ पास करायचे आहेत. यापूर्वीही पर्यायी विषय देण्याचे निर्णय घेतल्यामुळे जुन्या पिढ्यांचे नुकसान झाले होते. विद्यार्थ्यांना सामान्य गणित हा विषय देण्यात आला आहे. या विषयांना पर्याय दिल्याने शिक्षणाच्या हेतूला छेद दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना परिपक्व करण्यासाठी गणित व इंग्रजी विषयांना पर्याय देता येणार नाही. या निर्णयामुळे पुन्हा एकदा अनेक पिढ्या बरबाद होतील.- उज्ज्वलादेवी पाटील, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ