शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षे रेंगाळलेली बॅच पडणार बाहेर

By admin | Updated: March 4, 2016 00:14 IST

एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्यासह इतर सदस्यांच्या नियुक्तीवरून छेडलेल्या आंदोलनामध्ये २००८ बॅचचे विद्यार्थीही होते. या ‘बॅकलॉग’ असलेल्या विद्यार्थ्यांनाच लक्ष्य करून

पुणे : एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्यासह इतर सदस्यांच्या नियुक्तीवरून छेडलेल्या आंदोलनामध्ये २००८ बॅचचे विद्यार्थीही होते. या ‘बॅकलॉग’ असलेल्या विद्यार्थ्यांनाच लक्ष्य करून, हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रोजेक्टचे मूल्यमापन करण्याचे अस्त्र उपसण्यात आले आहे. मात्र, त्याला तात्पुरती स्थगिती मिळाल्याने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला. तब्बल नऊ वर्षे रेंगाळलेली २००८ची ही वादग्रस्त बॅच संस्थेमधून बाहेर पडण्याला मुहूर्त लागला आहे. एफटीआयआय प्रशासनाने प्रकल्प पूर्ण करून ७ मार्चपर्यंत संस्थेमधून बाहेर पडण्याची नोटीसच विद्यार्थ्यांना बजावली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.एफटीआयआय ही संस्था विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे प्रकाशझोतात आली असली, तरी यामध्ये बॅकलॉग असलेल्या २००८च्या विद्यार्थ्यांनाच केंद्र शासनाकडून लक्ष्य करण्यात आले होते. एफटीआयआयमध्ये चित्रपट आणि टेलिव्हिजनविषयक विविध कोर्स चालविले जातात. ज्यांचा कालावधी हा तीन वर्षांचा आहे. त्यानुसार २००८मध्ये संस्थेत दाखल झालेले विद्यार्थी २०११मध्ये संस्थेमधून बाहेर पडणे अपेक्षित होते. मात्र, नऊ वर्षांपासून काही विद्यार्थी संस्थेमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये २००८च्या २१ आणि २००९च्या ७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विलंबाला सरकारचा गलथान कारभार कारणीभूत असल्याचा सूर विद्यार्थ्यांनी आळविला होता. २००८मध्ये पुणे शहरात स्वाइन फ्लूची साथ होती. त्यामुळे संस्थेचा नियोजित अभ्यासक्रम सहा महिने उशिरा सुरू झाला. तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्याच वर्षी विद्यार्थिसंख्येमध्ये १२ वरून १६ अशी वाढ केली.मात्र वाढलेल्या संख्येच्या तुलनेत पायाभूत सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही. वाढलेल्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक वेळेत होणे अवघड बाब बनली. मुळातच अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षाचा असल्याचे अधिकृत असतानाही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरू होताना साडेचार वर्षांच्या कालावधीचे नियोजन दिले जाते. असे का, या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडे नव्हते. तरीही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आंदोलन दडपून टाकण्यासाठी २००८च्या बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यासाठी एफटीआयआयचे संचालक आणि केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाकडून प्राध्यापकांवर दबाव टाकण्यात आला. मात्र, प्राध्यापकांनी मूल्यमापन करणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे त्याला स्थगिती देणे भाग पडले. (प्रतिनिधी)