शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-नृसिंहपूरचा होणार कायापालट

By admin | Updated: March 4, 2016 00:42 IST

विद्युतीकरण, पथदिवे व विद्युतजनित्र या कामांसाठी १४.१८ कोटी खर्च करणार आहे. दळणवळण व सोयी-सुविधांसाठी १0७.५३ कोटी, तर महसूल विभागाला भूसंपादनासाठी ९ कोटींचा निधी देण्यात

पुणे : १९९३ च्या भूकंपात तडे गेलेल्या व दुरवस्था झालेल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा नृसिंहपूर परिसराचा कायापालट होणार आहे. तीर्थक्षेत्र देहू, आळंदी देवस्थान विकासाच्या धर्तीवर या परिसराचा विकास होणार असून, २६०.८६ कोटींच्या बृहत आराखड्याला बुधवारी शासनाच्या शिखर समितीने मान्यता दिली आहे. पुढील तीन वर्षांत या तीर्थक्षेत्राला उजाळा मिळणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथील भाविकांचे हे तीर्थक्षेत्र श्रद्धास्थान असून, महिन्याला येथे ३ ते ४ लाख भाविक येतात. तालुक्यातील या तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा मंजूर झाल्याने अनेक दिवसांची मागणी मार्गी लागली आहे. २०१५-१६ ते २०१७-१८ दरम्यान तीन टप्प्यात कामे मार्गी लावण्यात येणार आहे. त्यानंतर या परिसराचा पूर्णपणे कायापालट होणार आहे. तीर्थक्षेत्राचा बृहत आराखडा व अंमलबजावणीचे टप्पे ठरविण्यात आले आहेत. पुरातत्त्व विभाग, जलसंपदा, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विद्युत महामंडळ, महसूलसह इतर विभागांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या अंतर्गत मंदिर परिसराचे पूर्ण संवर्धन करण्यात येणार आहे. त्यानुसार घाट संवर्धन व अस्तित्वातील घाटास संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. बुडीत बंधारा बांधणे, जलक्रीडेसाठी धक्के, तराफे बांधणे, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची दुरुस्ती करणे, सुशोभीकरण करणे, सार्वजनिक सोयीसुविधांसह रस्त्यांचे रुंदीकरण, पथसुशोभीकरण, भक्त व पर्यटक निवास बांधकाम आदी कामे करण्यात येणार आहेत. या सर्व आराखड्याचे संनियंत्रण पर्यटन विभागाकडे राहणार आहे. (प्रतिनिधी)पुरातत्त्व विभाग : मंदिर परिसराचे संवर्धन, घाट संवर्धन व अस्तित्वातील घाटास संरक्षण भिंत बांधण्याचे काम करणार असून, ३४.८२ कोटींचा यावर खर्च करणार आहे. जलसंपदा विभाग : बुडीत बंधारे बांधणे, जलक्रीडा प्रकाराकरिता धक्के व तराफे बांधणे, अस्तितत्वातील कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरस्ती करणार असून, यासाठी ३0.३७ कोटी रुपये खर्च करणार आहे. पर्यटन/सा.बां. विभाग : सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी ११.२७ कोटी , अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण व पथसुशोभीकरण १५.३३ कोटी, भक्त व पर्यटक निवासासाठी १७.९६ कोटी, तर माणकेश्वर वाडा संरक्षक भिंतीचे संवर्धन व बांधकामासाठी १.६८ कोटी असे ४६.१८ कोटींची कामे करणार आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण : पाणीपुरवठा व मलनिस्सारण व्यवस्थेसाठी १७.४६ कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी १.७६ कोटी असे १९.२२ कोटींची कामे करणार आहे.विद्युत महामंडळ : विद्युतीकरण, पथदिवे व विद्युतजनित्र या कामांसाठी १४.१८ कोटी खर्च करणार आहे.दळणवळण व सोयी-सुविधांसाठी १0७.५३ कोटी, तर महसूल विभागाला भूसंपादनासाठी ९ कोटींचा निधी देण्यात येणार असून, इतर अनुषंगिक खर्चासाठी २.५0 कोटी ठेवण्यात येणार आहेत. पुणे : शिवनेरी किल्ला, सिंहगड किल्ला, लोणावळा येथील पर्यटन विकासाचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून, येत्या २ महिन्यात तो राज्यशासनाला सादर करण्यात येईल. भीमाशंकरचा प्रस्ताव तयार असून त्यावर रविवारी बैैठक घेतली जाणार असल्याचे, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.राव म्हणाले, शिवनेरी किल्ल्याच्या विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यासाठी आर्किआॅलॉजिकल कन्सलटंट नेमण्यात आला आहे. त्यांचा अभ्यास पूर्ण झाल्यावर प्रस्तावात ते नमूद करून अंतिम प्रस्ताव तयार करण्यात येईल. भिमाशंकर तिर्थक्षेत्राच्या विकासाचे नियोजन करण्यासाठी कन्सलटंट नेमण्यात आला आहे. त्याचे काम सुरू आहे. येत्या ६ मार्चला त्यासंदर्भात बैठक घेऊन प्रस्ताव तयार करण्यात येईल आणि तो पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला सादर करण्यात येणार आहे. लोणावळयाचा विकास साहसी क्रीडाप्रकारांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तर सिंहगड किल्ल्याच्या विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. तेथे पुणे महापालिका आणि पुरातत्व खात्याकडून अगोदरच काही कामे करण्यात येत आहेत. पण तेथे रोपवे उभारण्याचा, रस्ता रूंदीकरण, पाणीपुरवठा आदी प्रकल्प या प्रस्तावात प्रस्तावित करण्यात येणार आहे. भिमाशंकर तिर्थक्षेत्राच्या विकासासाठीचा प्रस्ताव १०० कोटी रूपयांचा तयार करण्यात आला आहे. पुणे, सातारा सोलापूरला जोडणारहे तीर्थक्षेत्र पुणे शहरापासून १२४, सोलापूरपासून ८२, तर सातारापासून १११ किलोमीटर अंतरावर असून, तेथून येथे येणाऱ्यासाठी रस्ते आहेत. मात्र, सद्य:स्थितीतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, त्यांचा दर्जा व रुंदीकरणाचाही भविष्यात विचार असून, तसा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्रस्थळावर १0 मीटर रुंदीचे १.५ किलोमीटर,६ मीटर रुंदीचे २.५ किलोमीटर रस्ते करण्यात येणार असून, भव्य असे प्रवेशद्वार करण्यात येणार आहे.