शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

नक्षल चळवळीला लगाम!

By admin | Updated: December 7, 2014 01:46 IST

अन्यायाविरुद्ध लढण्याच्या ईर्षेतून पाव शतकापूर्वी पूर्वेकडील राज्यांमध्ये सक्रिय झालेली नक्षल चळवळ पुढे मात्र हिंसक कारवायांपुरती मर्यादित झाली.

आत्मसमर्पण योजना : 9 वर्षात 446 लोकांनी धरली वेगळी वाट
मनोज ताजने - गोंदिया
अन्यायाविरुद्ध लढण्याच्या ईर्षेतून पाव शतकापूर्वी पूर्वेकडील राज्यांमध्ये सक्रिय झालेली नक्षल चळवळ पुढे मात्र हिंसक कारवायांपुरती मर्यादित झाली. त्यामुळे महाराष्ट्रात या चळवळीशी जुळलेल्या अनेक युवक-युवतींचा भ्रमनिरास झाला. त्यातच आत्मसमर्पण योजनेतून त्यांना नव्याने जीवन जगण्यासाठी आशेचा किरण दिसला आणि पाहता-पाहता या माध्यमातून गेल्या 9 वर्षात राज्यात 446 नक्षल्यांसह त्यांच्या नेत्यांनी आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे. यामुळे नक्षल चळवळीला राज्यात लगाम बसत आहे.
महाराष्ट्रात गडचिरोली आणि गोंदिया हे नक्षल जिल्हे म्हणून ओळखले जातात. मात्र, मधल्या काळात चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यांतही नक्षल समर्थक आढळून आले. एवढेच नाहीतर पुणो, नाशिकर्पयतही नक्षल्यांचे जाळे पसरत असल्याचे पुरावे पोलीस विभागाला मिळाले होते. गेल्या चार-पाच वर्षात माओवाद्यांशी जुळलेले अनेक ‘मास्टर माईंड’ पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याने त्यांचे जाळे पसरण्यास ब्रेक लागला़ बेरोजगारी आणि दारिद्रय़ाला कंटाळून केवळ ‘रोजगार’ म्हणून नक्षल चळवळीत ओढल्या गेलेल्या अनेकांना आपणही सर्वसामान्यांसारखे जीवन जगावे, छोटेखानी संसाराचे रंगविलेले स्वप्न पूर्ण करावे ही सुप्त इच्छा अस्वस्थ करीत होती. अशाच लोकांना नवजीवनाचे स्वप्न दाखविण्याचे काम ‘आत्मसमर्पण योजने’ने केले. 
नऊ वर्षापासून राबविण्यात येत असलेल्या या योजनेतून आतार्पयत 446 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आह़े 2क्13मध्ये 48 तर या वर्षी ऑक्टोबर अखेर्पयत 25 नक्षली व त्यांच्या नेत्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.  मिळालेले स्वातंत्र्य खोटे आहे, ख:या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी व विकासासाठी नक्षल चळवळीत सहभागी व्हा, असे आवाहन करीत आणि आदिवासी बांधवांच्या मागासलेपणाचा फायदा घेत त्यांना या चळवळीत ओढण्याचे काम नक्षल्यांनी केले.  अनेक जण बेरोजगारीला पर्याय म्हणून या चळवळीकडे आकर्षित झाले. चळवळीत काम करताना काही युवक-युवती पती-प}ी म्हणूनही राहू लागले. परंतु अंतर्गत शंकेचे व अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे काही वर्षातच त्यांचा भ्रमनिरास झाला.  
 
आर्थिक मदतीसोबत स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण
आत्मसमर्पण करणा:या नक्षलवाद्यांना राज्य व केंद्र सरकारकडून आर्थिक मदत व पुनर्वसन करण्यासाठी विविध प्रकारचे साहाय्य केले जाते. 
 
त्यात घरासाठी भूखंड, घरकूल किंवा व्यवसाय उभारणीसाठी बँकेचे अर्थसाहाय्य, शेती करण्यासाठी बैलजोडी, बैलबंडी, डिङोल इंजीन दिले जाते किंवा शेळीपालन व्यवसायासाठी मदत केली जाते. याशिवाय वाहनचालक, शिवणकाम, इलेक्ट्रीक फिटिंग, नळ फिटिंग, गवंडीकाम अशा विविध कामांचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार उभारण्यासाठी सक्षम केले जाते.