शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
3
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
4
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
5
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
6
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
7
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
10
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
11
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
12
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
13
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
14
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
15
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
16
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
17
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
18
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
19
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
20
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला

नानाकाका रागावले, बरं मग?

By admin | Updated: February 18, 2015 02:27 IST

नानाकाका लोकांशी सौजन्याने वागले; साऱ्यांंची त्यांनी प्रेमभरे वास्तपुस्त केली; ज्यांच्या व्यासपीठावर चढले; त्यांची तोंडदेखले का होईना; प्रशंसा केली,

हेमंत कुलकर्णी - नाशिकनानाकाका लोकांशी सौजन्याने वागले; साऱ्यांंची त्यांनी प्रेमभरे वास्तपुस्त केली; ज्यांच्या व्यासपीठावर चढले; त्यांची तोंडदेखले का होईना; प्रशंसा केली, भोवतीच्या गराड्यासमोर खळखळून हसले, असे काही घडले तर ती बातमी! पण नानाकाका रागावले, यात कुठली आली बातमी? ते तसेही डोक्यात राख घालून फिरतच असतात आणि फिरता फिरता डोक्यात आणखी कोणती आणि किती राख घालून घ्यायची याचे निमित्त शोधत असतात. बारामतीत झालेली परवाची पवार-मोदी भेट, हे त्यांना गवसलेले लेटेस्ट निमित्त, इतकेच. पण त्यांनी या निमित्तावरून बरीच आगपाखड केली. नाना पाटेकरांनी म्हणे मोदींना भाबडेपणाने (नाना आणि भाबडा? कोण ऐकतंय रे तिकडे) मतदान केले तेच बहुधा मोदींनी पवारांच्या पार्टीला करप्ट पार्टी म्हणून संबोधल्याबद्दल आनंदी होऊन. त्यामुळे ज्यांना काल तुम्ही हिणवलंत त्यांच्याच गळ्यात आज गळे घालून आमच्यात कोणतेही वितुष्ट नाही असे सांगाल तर कसे पटावे, हा नानांचा रोकडा सवाल.मुळात नाना मुंबई वा पुण्याचे मतदार (चूभूदेघे) असल्याने त्यांनी व्यक्तिगतरीत्या मोदींना मत देण्याची सुतराम शक्यता नाही. मोदींच्या एखाद्या पिलांटूला दिले असल्यास ती बाब निराळी. पण तरीही मुदलात नानांनी दिलेले मत गुप्त. ते तसे असावे ही लोकशाहीची प्राथमिक अपेक्षा. तरीही त्यांनी या अपेक्षेला छेद देत, गोपनीयता फोडली. फोडली तर फोडली, पण ज्या शब्दातच मुळात ‘दान’ आहे, त्या दानाबाबत म्हणतात, उजव्या हाताने दिले तर डाव्याला ते कळता कामा नये. पण नानानी त्याचा जाहीर उच्चार केला. म्हणजे नानांचा प्रमाद क्रमांक दोन. (यापुढील प्रमाद कृपया वाचकांनीच मोजावेत)राजकीय किंवा वैचारिक मतभेद म्हणजे व्यक्तिगत वितुष्ट नव्हे, ही बाब अनेकांनी अनेकवार स्पष्टपणाने बोलून दाखविली आहे. नाना म्हणतात, त्याप्रमाणे वागायचे ठरविले तर पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घ्यायलाच नको होती. ‘दूर हो जा मेरी नजरों के सामने से’! पण तसे झाले नाही, तसे होत नसते. ज्या देशाला आपण सारे न चुकता, शत्रू मानतो, त्या पाकिस्तानच्या पंतप्रधानालाही मोदींनी परवाच फोन करून क्रिकेट सामन्याविषयीच्या ख्यालीखुशालीची चर्चा केली होती. राजकारणी वेगळा, सत्ताकारणी वेगळा आणि मुत्सद्दी तर त्याहूनही वेगळा. ‘हमने आपके उपर सारी उम्मीदे लगा रख्खी थी और आपही बेवफा निकले’ अशासारखा काहीतरी नानाकाकांचा मोदी कांकांवरचा राग दिसतो. आणि या रागाचे निमित्त शरदकाका बारामतीकर! त्यांना मोदी भेटले आणि साक्षात त्यांच्या अंगणात जाऊन भेटले, याचा मनस्वी संताप नानांना आलेला दिसतो. म्हणजे मोदींवरील त्यांचा संताप सात्त्विक म्हणायचा तर पवारांवरील त्यांचाच संताप क्रोधाग्नीपूर्ण म्हणायचा. असे का बरे?कुठलाशा एका मराठी सिनेमा किंवा दूरचित्रवाणीच्या बक्षीस समारंभाची एक चित्रफीत वारंवार छोट्या पडद्यावर झळकत असते. त्या समारंभात नानाकाका आणि शरदकाका दोघेही हजर होते. शरदकाकांच्या हस्ते त्यात नानाकाकांचा गौरव होतो. तेव्हां याच शरदकाकांविषयी नाना बोलतात, तेव्हां त्यांच्या स्वादुपिंडाचा पाझर त्यांच्याच ओष्ठकडांपर्यंत आल्याचा दर्शकाला भास होत असतो. मग यकायक तेच शरदकाका इतके दुष्ट निघावेत की त्यांच्या संगतीत गेल्याने नरेन्द्रचाचू पार बिघडून जातील असे भय नानाकाकांना वाटावे? हे भय तरी किती पराकोटीचे? सुसंगतीचा असा वारंवार त्याग होणार असेल तर मग तुम्हा परीस शिवसेना, मनसे आणि एमआयएम काय वाईट, असा मोठा बिकट सवालही नानांच्या मनात तरळून गेलेला दिसतो. म्हणजे काय, हे तिघे तसे ‘कामसे गये’ कॅटॅगरीतलेच!तरीही असे बोलले जाते की, नाना म्हणजे रोखठोक आणि परम देशभक्त माणूस. ‘एक बार ठान ली तो, फिर अपनी भी ना सुननेवाला’! त्यामुळे मध्यंतरी नानानी एक प्रतिज्ञा करून टाकली, संजय दत्तबरोबर कदापि काम न करण्याची! (जणू संजूबाबाने नाना नाना करीत अंथरूणच धरले होते) का, तर म्हणे तो देशद्रोही आहे. खरेतर ही प्रतिज्ञा केली, तेव्हा संजय दत्तला टाडा कोर्टाने देशद्रोहाच्या आरोपातून मुक्त केले होते आणि बेकायदा शस्त्रे बाळगण्याच्या गुन्ह्याखाली शिक्षा केली होती. पण जेव्हा म्हणजे मुंबईतील जातीय दंग्यांच्या नंतर संजय दत्तला पोलिसांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करून अंडा सेलमध्ये ठेवले होते तेव्हा त्याच्या पाठीशी उभे राहणारे, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील केवळ एकच बलदंड नाव पुढे आले होते व ते होते, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे. त्यांनी त्या वेळी घेतलेल्या भूमिकेच्या ऋणात जसे संजयपिता सुनील दत्त अगदी अखेरपर्यंत होते (काँग्रेसचे खासदार असूनही त्यांना पक्षातून कोणाची सहानुभूती मिळाली नव्हती) तसाच संजूबाबादेखील आहे. पण तेव्हा नानाकाकांनी बाळासाहेबांना उद्देशून, असे काही म्हटले नव्हते की, बाळासाहेब, आम्ही तुमच्यावर मनस्वी प्रेम करतो, तुमच्या आज्ञेवरून मतदानही करतो, तुम्ही प्रखर देशाभिमानी आहात म्हणूनच आम्ही तुमच्यावर जीव ओवाळून टाकतो आणि आता तुम्हीच एका देशद्रोह्याच्या पाठीशी उभे राहता? छे, छे, बाळासाहेब, मग तुमच्यापेक्षा अबू आझमी काय वाईट?सबब, नानाकाका तुमचं हे वागणं, बोलणं आणि फिस्कारणं बघितल्यावर अकबर इलाहाबादी यांची क्षमा मागून असंच म्हणावंसं वाटतं की, हम कत्ल भी करते है;तो चर्चा नही होता,और वो आह भी भरते है;तो हंगामा खडा होता!