मिलिंदकुमार साळवे ल्ल श्रीरामपूर (अहमदनगर)महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची मानव विकास निर्देशांकात मुंबईची (आठवा क्रमांक) पीछेहाट झाली आहे, तर पुणे शहर तालुक्याने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. २०१२ च्या महाराष्ट्र मानव विकास अहवालात मुंबई, ठाणे, नाशिक व नागपूर या महानगरांभोवतीच विकास केंद्रीत झाला असून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही आदिवासी तालुक्यांमध्ये मात्र विकासाची गंगा पोहोचलीच नसल्याचे वास्तव उघड झाले आहे.संबंधित अहवाल अजून अधिकृतपणे प्रकाशित व्हायचा आहे. राज्यातील ३५६ तालुक्यांपैकी मानव विकास निर्देशांकात तळाचे म्हणजे शेवटचे १५ तालुके आदिवासी आहेत. पहिल्या पंधरामध्ये तीन तालुके असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातीलडहाणू (३४२), विक्रमगड (३५१) जव्हार, तलासरी व मोखाडा तालुक्यांचा शेवटच्या १५ मध्ये समावेश आहेत. एकीकडे ठाणे शहर तालुका विकासात आघाडीवर तर शहरापासून काही किलोमीटरवर असलेले आदिवासी तालुके मात्र तळाशी असल्याचे विरोधाभासी चित्र आहे. मुंबईचाही मानव विकास निर्देशांक घसरला असून पुणे, नागपूर, ठाणे व नाशिक या शहरांनी आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र मानव विकास मिशन या राज्य सरकारनेच स्थापन केलेल्या स्वतंत्र संस्थेने महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या विकासाचे मूल्यमापन करून त्यांचा मानव विकास निर्देशांक तयार केला आहे.पहिले १५ तालुकेपुणे शहर, नागपूर शहर, ठाणे शहर, हवेली (पुणे), नाशिक, कल्याण, पनवेल (रायगड), मुंबई, वसई (ठाणे), उल्हासनगर, (ठाणे), सातारा, करवीर (कोल्हापूर), अंबरनाथ (ठाणे), वर्धा व नागपूर ग्रामीण.तळाचे १५ तालुके(सर्व आदिवासी)डहाणू, चिखलदरा, नवापूर, त्रिंबक, एटापल्ली, जव्हार, तलासरी, सुरगणा, पेठ, विक्रमगड, सिरोंचा, मोखाडा, अक्कलकुवा, भामरागड, अक्राणा.मराठवाडा मागेचमराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक राज्याच्या ०.५८ टक्के सरासरीपेक्षा खाली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मराठवाड्यातील काही तालुक्यांची निर्देशांक उंचावण्यासाठी विशेष अभियानांतर्गत निवड करण्यात आली आहे.च्शिक्षण, आरोग्य व दरडोई उत्पन्न यांच्या आधारे मानव विकास निर्देशांक काढला जातो. या तिन्ही क्षेत्रांतील विकास अपेक्षित पातळीपेक्षा कमी असेल तर तो कमी निर्देशांक व जास्त असेल तर तो जास्त निर्देशांक मानला जातो. या तीन क्षेत्रांतील मागासलेपण शोधण्याचे काम या माध्यमातून केले जाते. शून्य ते एक अशी या निर्देशांकाची मोजणी होते. एक शतांशापासून एकपर्यंत चढत्या क्रमाने निर्देशांक काढला जातो.मी दोन वर्षांपूर्वी अध्यक्ष होतो. त्यामुळे अहवाल कधी प्रकाशित होणार याविषयी माहिती नाही. - कृष्णा भोगे,माजी अध्यक्ष, महाराष्ट्र मानव विकास मिशन
मानव विकासात मुंबईची पीछेहाट
By admin | Updated: December 31, 2014 01:14 IST