शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मुजोर रिक्षाचालकांची आता गय करणार नाही!

By admin | Updated: March 6, 2017 03:48 IST

बेशिस्त आणि मुजोर रिक्षा चालकांंकडून बसचालक, वाहतूक पोलिसांना होत असलेल्या मारहाणीची दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे.

कल्याण : बेशिस्त आणि मुजोर रिक्षा चालकांंकडून बसचालक, वाहतूक पोलिसांना होत असलेल्या मारहाणीची दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे. बस डेपोपासून रिक्षा पकडण्याची सोय प्रवाशांना मिळावी, म्हणून डेपोच्या परिसरात रिक्षा स्टॅण्ड आहेत. पण प्रवासी मिळवण्याच्या स्पर्धेत रिक्षाचालकांकडून होणारे बेशिस्त, मुजोर वर्तन खपवून घेतले जाणार नाही. त्यांच्याकडून अशा घटनांची पुनरावृत्ती झाल्यास गय करणार नाही, असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी येथे दिला.भिवंडी बस डेपोनजीक रिक्षाचालकाच्या मारहाणीत बसचालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर ठाण्यात बसचालकाला मारहाण झाली. नंतर कल्याणमधील डेपोतील बसचालक सुरेश भोसले याला मारहाण झाली. त्यापाठोपाठ भिवंडीत पुन्हा वाहतूक पोलिसांंवर हल्ला आला. या घटनांची दखल घेत रावते यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर कल्याण आरटीओ व वाहतूक पोलिसांनी २५८ रिक्षांवर कारवाई केली. त्यातील २३५ रिक्षा जप्त केल्या. त्यातील ३५ रिक्षा कल्याण बस डेपोत रावते यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आल्या. या प्रसंगी महापौर राजेंद्र देवळेकर, कल्याण आरटीओ अधिकारी नंदकिशोर नाईक, ठाणे रिजन रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर, एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष राजा पुण्यार्थी, कल्याण बस डेपो व्यवस्थापक पी. एस. भांगरे आदी उपस्थित होते.मराठीतून परीक्षेचा निवाडा देताना उच्च न्यायालयाने प्रवासी वाहतूक सुरक्षेचा अहवाल मागवला. त्यासाठी मी घटनांचा तपशील जाणून घेतला. मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक प्रशासनाचे आदेश दिल्याने आम्ही पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा टोला हसतहसत रावते यांनी लगावला. (प्रतिनिधी)>बस डेपो नव्याने बांधणारकल्याण बस डेपोची दुरवस्था झाली आहे. तोे नव्याने बांधणार का, असे विचारता रावते म्हणाले, यापूर्वीच्या सरकारने बस डेपो नुतनीकरण बीओटी तत्वावर करण्याचे ठरवले होते. बीओटीची दुकाने थाटली जाणार होती. त्याचे व्यावसायिकरण केले जाणार होते. आम्ही बीओटी तत्वावर विकास करणार नाही. कल्याण बस डेपोची परिस्थिती बिकट आहे. अशीच अवस्था झालेले बस डेपो नव्याने बांधण्यासाठी चाळीस वास्तुविशारदाची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून आराखडा तयार केला जाईल. भांडवली खर्चातून बस डेपो नव्याने बांधण्यात येतील. कल्याण बस डेपोची दोन्ही प्रवेशद्वारे सोयीची नाही. त्यामुळे बस डेपोच्या कार्यशाळेच्या दिशेने प्रवेशद्वार करण्याची सूचना आहे. तसा प्रस्ताव आला, तर विचार करू, असे त्यांनी स्पष्ट केले. ओेला, उबेरची लूट रोखणारओला, उबेर टॅक्सी चालकांकडे आॅल इंडिया परमिट आहे. तरीही ते स्थानिक पातळीवर गाड्या चालवून काळ््या-पिवळ््या रिक्षा-टॅक्सीचा धंदा अडचणीत आणत आहेत. एमएमआरडीए क्षेत्रात ओला, उबेरने एलपीजी व सीएनजी इंधन वापरले पाहिजे. त्यासाठी आवश्यक तांत्रिक दुरूस्त्या करण्यास त्यांना सहा महिन्यांची मुदत दिली आहे. त्यातून बाडे आणकी कमी होईल. या ग्डायंसाठी एक रंग ठरवून दिला आहे. त्यांच्या नोंदणीकरीता २५ हजारांचे शुल्क आकारले जाणार आहे. १४ सीसीच्या वर असलेल्या ओला, उबेरला तीन लाख ४१ हजार रुपये नोंदणी शुल्क आकारले जाईल. ओला, उबेरही मीटरवर आणली जाईल. त्यामुळे मनमानी भाडे आकारले जाणार नाही. त्यात धोक्याचे बटन असेल. जीपीएस सिस्टीम असेल, अशी ग्वाही रावते यांनी यावेळी दिली. पगारवाढीत संघटनांचीच चालढकलबस कामगारांच्या पगारवाढीच्या कराराची मुदत उलटून गेली, तरी करार केला जात नसल्याचे विचारल्यावर मान्यताप्राप्त संघटनांशी चर्चा सुरू आहे. पण त्याच चालढकल करतात. संघटनांकडून ३५० मागण्या आल्या आहेत. सगळ््याच व्यवहार्य नाहीत. ज्या पूर्ण करणे शक्य आहे, त्या करण्याचा लवकर निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. >मदतीवरून वादंगपरिवहन मंत्री रावते यांनी शेलार रुग्णालयात उपचार घेत असलेले जखमी चालक भोसले यांची भेट घेतली. एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष पुण्यार्थी यांनी संघटनेतर्फे भोसले यांना २५ हजारांच्या मदतीचा धनादेश दिला. तेव्हा संघटनेला आत्ता माझी आठवण झाली का, असा संतप्त सवाल चालक भोसले यांनी विचारला. तो संदर्भ घेत पत्रकारांनी चालकाला उपचारासाठी तातडीने मदत का दिली गेली नाही, असा प्रश्न केल्यावर बस डेपो प्रशासनाकडून तातडीने चालकाला ८० हजारांची मदत देण्यात येणार होती. पण चालकाने त्याचा मेडिक्लेम असल्याने मदत नाकारल्याचा खुला करण्यात आला. मनसे कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव म्हस्के यांनी सांगितले, प्रशासनाकडून फक्त ३० हजारांची मदत देण्याचा प्रयत्न झाला. ही मदतीची रक्कम प्रशासन चालकाच्या पगारातून कापून घेणार होते. मग चालक कशाच्या आधारे मदत घेईल? यापूर्वीही दोन महिला वाहकांना मारहाण झाल्याची घटना कल्याण बस डेपोत घडली होती. तेव्हाही त्या महिला वाहकांना उपचारासाठी मदत दिली गेली नसल्याचा आरोप म्हस्के यांनी केला.>९५० सुरक्षारक्षक नेमणारबस डेपो परिसरात सुरक्षारक्षकांची कमतरता आहे. ते पुरवण्यासाठी ९५० सुरक्षारक्षक भरतीची प्रक्रिया सुरु आहे. त्यापैकी ५५० सुरक्षारक्षक लवकरच रुजू होतील. उर्वरित प्रक्रियाही लवकरच पूर्ण केली जाईल, असा तपशील त्यांनी दिला.