शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

आमदार म्हणताहेत, व्हॉटसअ‍ॅप... नको रे बाप्पा!

By admin | Updated: December 16, 2014 03:47 IST

गिरीश भाऊकडं डबा खायला ये, असा मेसेज व्हॉटसअ‍ॅपवर दिसला किंवा रामदास भार्इंच्या डब्यातील पापलेटचा फोटो डाऊनलोड झाला

संदीप प्रधान, मुंबईगिरीश भाऊकडं डबा खायला ये, असा मेसेज व्हॉटसअ‍ॅपवर दिसला किंवा रामदास भार्इंच्या डब्यातील पापलेटचा फोटो डाऊनलोड झाला की भुकेने कासावीस असलेला नवखा सदस्य पटकन उठतो आणि उठून सभागृहाबाहेर पडतो. त्या वेळी आपण सभागृहातील पाळायचे संकेत व शिष्टाचार यांचा भंग करतो याचे भान त्याला राहत नाही. त्यामुळे संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी नवनिर्वाचित सदस्यांना आचारसंहितेचा चमचमीत खाऊ दिला आहे.विद्यमान विधानसभेतील सुमारे १३० सदस्य हे नवीन आहेत. त्यांना सभागृहातील संकेतांची फारशी कल्पना नाही. तर काही सदस्यांचे मन अजूनही ‘तरुण’ असल्याने सभागृहात असूनही व्हॉटसअ‍ॅप, इंटरनेट यामध्येही रमलेले असतात. काही आमदार एकमेकांना सभागृहाच्या लॉबीत बोलावण्यासाठी किंवा दुपारी जेवणाचा डबा खाण्याचे निमंत्रण व्हॉटसअ‍ॅपवरून धाडतात. भाषणाची पुरेशी तयारी न झालेले सदस्य आकडेवारी व अन्य माहिती सभागृहातच मोबाइल इंटरनेटवर शोधत असतात. त्यामुळे अशा ‘मोबाइलवेड्या’ सदस्यांना समज देण्यासाठी संसदीय कामकाज मंत्र्यांनी आचारसंहिता लागू केली आहे.असंसदीय शब्दप्रयोग टाळाभाषण करताना निंदानालस्ती करणारे आरोपात्मक किंवा असंसदीय शब्दप्रयोग करू नयेत. एखादा शब्द वा वाक्प्रयोग असंसदीय आहे, असे अध्यक्षांनी सांगितल्यास त्याबाबत चर्चा न करता ते मागे घेतले पाहिजेत, अशी समज या परिपत्रकाद्वारे देण्यात आलेली आहे. सभागृहात पक्षाचे चिन्ह असलेली वस्तू (दुपट्टा, फलक वगैरे) आणू नये, अशा सूचनांची जंत्री सदस्यांना देण्यात आली आहे. यामुळे अपशब्द वापरून विरोधी आमदारांवर वार करणाऱ्यांना चाप बसेल.