शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

‘मेघंकराचा राजवाडा’ नामशेष होण्याचा मार्गावर!

By admin | Updated: August 15, 2015 01:18 IST

पैनगंगा नदीच्या काठावरील ‘मेघंकराचा राजवाड्या’ची पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे दैन्यावस्था झाली आहे. त्याची देखभाल व दुरुस्तीमध्ये प्रचंड उदासीनता दाखवली जात आहे.

- ब्रह्मानंद जाधव, मेहकरपैनगंगा नदीच्या काठावरील ‘मेघंकराचा राजवाड्या’ची पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे दैन्यावस्था झाली आहे. त्याची देखभाल व दुरुस्तीमध्ये प्रचंड उदासीनता दाखवली जात आहे. मेघंकराच्या राजवाड्यातील यज्ञशाळा पूर्णत: नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरला पौराणिक व ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न वारसा लाभला आहे. मेहकर नगरीचा ब्रह्मांड पुराणात ^‘मेघंकर’ असा उल्लेख आहे. या नगरीत पूर्वी सोन्याचे खांब असलेले वाडे असल्याचे वैभवशाली वर्णन ब्रह्मपुराणात आहे. त्याचप्रमाणे मेहकरला यज्ञभूमी मानले गेल्याचा उल्लेख मत्स्यपुराणात आहे. शुद्ध तूप यज्ञात अर्पण करणारी नदी म्हणून पैनगंगेचा उल्लेख आहे. म्हणून पैनगंगेच्या काठी मोठ्या संख्येने मंदिरे व यज्ञकुंडे आहेत.मेघंकर राजाच्या राजवाड्यातील यज्ञशाळा असल्याची आख्यायिका आहे. पुरातत्त्व विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने, या यज्ञशाळेच्या ६० दगडी स्तंभांपैकी सध्या केवळ २५ स्तंभच उरले आहेत. या प्रत्येक स्तंभावर कोरीव कामाची अप्रतिम कलाकुसर आहे. त्यातील काही स्तंभ आजही मोठ्या दिमाखात उभे असून, पुरातन वैभवाची साक्ष देत आहेत. परंतु पुरातत्त्व विभागाचे याकडे असेच दुर्लक्ष होत राहिल्यास, पुढच्या पिढीला पाहण्यासाठी राजवाड्याचे अवशेषही शिल्लक उरणार नाहीत.पुरातत्त्व विभागाचा फलकही गंजला!ही पुरातन वास्तू, पुरातत्त्व विभागाच्या वतीने १९५८च्या प्राचीन स्मारके, पुरातत्त्वीय स्थळे व अवशेष अधिनियमान्वये राष्ट्रीय महत्त्वाची म्हणून घोषित करून, ताब्यात घेण्यात आली आहे. यासंदर्भात ‘संरक्षित स्मारक’ या आशयाचा फलक वास्तूबाहेर लावून, स्मारकाशी छेडछाड करण्यास नागरिकांना मनाई करण्यात आलेली आहे; परंतु प्रत्यक्षात या वास्तूचे संरक्षण तर दूरच, ‘संरक्षित स्मारक’ या आशयाच्या फलकालाच ‘गंज’ चढला आहे.याच नदीच्या काठावर वसलेली पुरातन वास्तू (मढ) ही मेघंकर राजाच्या राजवाड्यातील यज्ञशाळा असल्याची आख्यायिका आहे. राजवाड्याच्या मधल्या भागात २३ फुटांचे भव्य यज्ञकुंड असून, दक्षिण बाजूच्या गावकोटाशेजारी विटांपासून बांधलेला मोठा दरवाजा होता. त्यावरील कमानीवर एक शीलालेखही आहे.