शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
7
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
10
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
11
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
12
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
13
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
14
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
15
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
16
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
18
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
19
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
20
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?

माणूस घडविण्याचे साहित्य निर्माण व्हावे: वसंत आबाजी डहाके

By admin | Updated: January 29, 2017 02:32 IST

अकोल्यात थाटात उद्घाटन; चौथे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन

अकोला, दि. २८- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्वसमावेशक असे साहित्य निर्माण केले. त्यांच्या साहित्यामध्ये सौंदर्य आणि समाजासाठीची उपयुक्ततासुद्धा आहे. साहित्य हे पुस्तकातून शिकण्याची गोष्ट नव्हे. आंतरमनातून साहित्य जन्माला येते. ज्या साहित्यात समाज, देश, राजकारण आणि विकासाचा विचार मांडलेला आहे, असे साहित्य राष्ट्रसंतांनी लिहिले आणि समाजासमोर मांडले; परंतु सद्यस्थितीत माणूस भौतिक संपत्तीच्या मागे धावत आहे. माणसातील माणूसपण हरवत आहे. त्यामुळे माणूस घडविण्याचे साहित्य निर्माण व्हायला हवे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक आणि अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीतर्फे स्वराज्य भवन प्रांगणातील ऋषिवर्य घुसरकर महाराज साहित्य नगरीमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या चौथ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले. यावेळी ग्रामगीता विचारपीठावर खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी, गुरुकुंज आश्रमाचे सर्व सेवाधिकारी प्रकाश महाराज वाघ, जैव राष्ट्रसंत जनसाहित्यिक डॉ. सुभाष सावरकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक पटोकार, रमेशचंद्र सरोदे, किसन पारिसे, महादेवराव भुईभार, माजी महापौर सुमन गावंडे व प्राचार्य संगीता बघेले आदींची प्रमुख उपस्थिती होती. वसंत डहाके बोलताना म्हणाले, बालपणी माझाही राष्ट्रसंतांशी संबंध आला. त्यांची भजने मी वाचली. ग्रामगीता वाचल्यावर त्यांनी काळाचा, परिस्थितीचा विचार करून साहित्य लिहिले. प्रेरणादायी आणि बोध देणारे साहित्य राष्ट्रसंतांनी निर्माण केले. त्यांच्या साहित्यामध्ये समाजाची जडणघडण, ग्रामविकास, स्वच्छता, राजकारण, देशाच्या विकासाबाबत भाष्य आहे. अंधश्रद्धेवर प्रहार करून समाजाला जागे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. देशभक्ती जागविण्यासाठीसुद्धा भजने, साहित्याचा आधार घेतला. त्यामुळेच त्यांचे साहित्य जगात पोहोचले. सुंदर आणि उपयुक्त असे साहित्य राष्ट्रसंतांनी समाजासाठी निर्माण केले, असे त्यांनी सांगितले. राज्याराज्यांमध्ये पाण्यावरून वाद होत आहे. माणसातील माणूसपण हरवत चालले आहे. त्यामुळेच समाजाला उपयुक्त अशा साहित्याची गरज आहे. त्यासाठी नवोदित साहित्यिकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी केले. आभार प्रा. डॉ. राजीव बोरकर यांनी मानले. ग्रामगीता जीवन गौरव पुरस्कार प्रदानराष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनामध्ये भजनसम्राट स्व. रामभाऊ गाडगे स्मृतिप्रीत्यर्थ ग्रामगीता जीवन गौरव पुरस्कार हभप रामधन महाराज, डॉ. भास्करराव विघे यांना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त प्रा. गोपाल मानकर, श्रीकृष्ण डांबलकर यांचा सत्कार करण्यात आला.सेंद्रिय शेतीसाठी शेतकर्‍यांना अनुदान: कृषी मंत्री फुंडकरराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा मी एक कार्यकर्ता आहे. राष्ट्रसंतांनी गोरगरीब, दु:खी, कष्टी समाजाचा विचार केला. ग्रामविकास आणि शेतीचा विकास त्यांनी ग्रामगीतेतून मांडला; परंतु थोडेबहुत राजकारणीच समाजकारण करताना दिसतात. ग्रामगीता वाचून राजकारण केले तर राष्ट्रसंतांना अपेक्षित समाज, राष्ट्र घडेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सेंद्रिय शेतीचा ग्रामगीतेतून पुरस्कार केला आहे. त्यामुळे राज्यात सेंद्रिय शेतीचा कसा विकास होईल आणि क्षेत्र कसे वाढेल, यादृष्टीने आपण प्रयत्न करू. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकर्‍यांना अनुदान उपलब्ध करून देऊ, असे मत कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी व्यक्त केले.