Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : "नकली भगवान हार गए, नकली संतानने आपको हराया है"; संजय राऊतांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 04:53 PM2024-06-04T16:53:08+5:302024-06-04T17:17:30+5:30

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Sanjay Raut And Narendra Modi : मिशन ४५ चं स्वप्न बघणाऱ्या महायुतीला राज्यात २० जागाही मिळणं अवघड झालं आहे. याच दरम्यान संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Sanjay Raut Slams BJP Narendra Modi | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : "नकली भगवान हार गए, नकली संतानने आपको हराया है"; संजय राऊतांचं टीकास्त्र

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : "नकली भगवान हार गए, नकली संतानने आपको हराया है"; संजय राऊतांचं टीकास्त्र

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रातील ४८ जागांसह देशातील ५४३ जागांचा निकाल आता हळूहळू स्पष्ट होऊ लागला आहे. त्यात राज्यातील ४८ जागांवर महायुतीला जबरदस्त फटका बसला आहे. मिशन ४५ चं स्वप्न बघणाऱ्या महायुतीला राज्यात २० जागाही मिळणं अवघड झालं आहे. महाराष्ट्रात काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यात १७ जागा लढवणाऱ्या काँग्रेसला ११ ते १२ जागांवर आघाडी आहे. याच दरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"देशाच्या जनतेने नरेंद्र मोदीजींना नाकारलं आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा हा पराभव आहे. मोदी आणि शाह यांचा अहंकार संपवला आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "पंतप्रधान स्वत:ला देव समजतात, त्यांचं नाक आता कापलं गेलं आहे. राहुल गांधींचा परफॉर्मन्स हा मोदींपेक्षा बेस्ट आहे" असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे. 

"भाजपाला बहुमत नाही. भाजपा हारली आहे. अयोध्येत भाजपाचा पराभव झाला आहे. देशाच्या जनतेने नरेंद्र मोदीजींना नाकारलं आहे. भाजपाने २०१४ आणि २०१९ मध्ये बहुमत प्राप्त केलं होतं. पण २०२४ मध्ये भाजपाला बहुमत मिळालेलं नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा हा पराभव आहे. मोदी आणि शाह यांचा अहंकार संपवला आहे. आता यांची धावपळ सुरू आहे. सर्वांना हात-पाय जोडत आहेत. आमच्यासोबत या आणि सरकार बनवा असं सांगत आहेत. पण मी म्हणतो की मोदीजींचं सरकार येणार नाही." 

"मोदींनी राजीनामा द्यायला हवा. मोदीजींचा पराभव झाला आहे. भाजपाचा पराभव झाला आहे. पंतप्रधान स्वत:ला देव समजतात त्यांचं नाक आता कापलं गेलं आहे. ४०० पार, ३५० पार असं सांगत होते पण ते २५० पार देखील गेलेले नाहीत. मुंबई, महाराष्ट्रात आम्ही मोदींना रोखलं आहे. संध्याकाळपर्यंत मुंबईचा निकाल पाहा आम्ही पाच जागा जिंकत आहोत. देशात परिवर्तन होत आहे. सकारात्मक निर्णय येत आहेत."

"राहुल गांधींचा परफॉर्मन्स हा मोदींपेक्षा बेस्ट आहे. संध्याकाळपर्यंत भाजपाच्या खूप सीट कमी होणार आहेत. मतमोजणी सुरू आहे, ते २४० पेक्षा पण कमी जागांवर येतील. सरकार बनवण्यासाठी सर्वांना फोन करत आहेत. नरेंद्र मोदींनी आता गप्प बसायला हवं. ते स्वत:ला देव समजतात, पण आता नकली भगवान हार गए, नकली संतानने आपको हराया है" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Sanjay Raut Slams BJP Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.