धुळे : चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा खून केल्याप्रकरणी पती भटू आखाडे याला मंगळवारी जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने आखाडे याला पाच हजार रुपये दंड, तो न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा तसेच आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक वर्ष कारावासाचीही शिक्षा सुनावली. खुनाची ही घटना तालुक्यातील महिंदळे शिवारात गेल्या वर्षी ९ फेब्रुवारीला घडली होती. भटू हिंमत आखाडे व संगीता यांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झालेले होते. तीक्ष्ण हत्याराने तसेच मुसळीसारख्या वस्तूने संगीता यांच्यावर वार करून भटूने तिचा निर्घृण खून केला. त्यानंतर भटूने स्वत:वर वार करून तसेच जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. (प्रतिनिधी)
पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप
By admin | Updated: July 16, 2014 03:04 IST