मुंबई : राज्य सरकारने रात्री उशिरा तब्बल ७३ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. गेल्या काही वर्षांत एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात बदल्या होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्ताने प्रशासनात मोठा खांदेपालट केला आहे. दीर्घकाळापासून वित्त विभागाची धुरा सांभाळत असलेले सुधीरकुमार श्रीवास्तव यांची परिवहन विभागात बदली झाली. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांना एमएमआरडीएमध्ये पाठविण्यात आले आहे. जलसंपदा विभागात नाखूश असलेले सतीश गवई यांच्याकडे पर्यावरण विभागाची धुरा देण्यात आली. पर्यावरण विभागात असलेल्या मालिनी शंकर यांचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याशी मतभेद होते. वित्त विभागातील सीताराम कुंटे यांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाची कमान सोपविण्यात आली आहे.सोलापूर जिल्ह्यात अत्यंत प्रभावी काम केलेले तुकाराम मुंढे यांना नवी मुंबई महापालिकेचे आयुक्तपद देण्यात आले आहे. मुंढे यांच्या बदलीची पालक मंत्र्यांसह अनेकांनी मागणी केली होती. मात्र, मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते.गडचिरोलीचे सध्याचे जिल्हाधिकारी रंजितकुमार हे सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी असतील. नवी मुंबईचे सध्याचे आयुक्त दिनेश वाघमारे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त असतील. आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये या पदावर असलेले राजीव जाधव हे आदिवासी विकास विभागाचे नवे आयुक्त असतील. काही आयएएस अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्तीचे ठिकाण असे - १) उपमन्यु चटर्जी - सदस्य सचिव उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ; मुंबई. २) ऊज्ज्वल ऊके - प्रधान सचिव वस्रोद्योग, सहकार, पणन. ३) प्रवीण दराडे - अतिरिक्त महानगर आयुक्त एमएमआरडीए. ४) एस.व्ही.आर. श्रीनिवास - व्यवस्थापकीय संचालक; सिकॉम ५) आशिषकुमार सिंह - प्रधान सचिव; सार्वजनिक बांधकाम. ६) मुकेश खुल्लर - प्रधान सचिव (सेवा) सामान्य प्रशासन विभाग ७) डॉ.भगवान सहाय- अतिरिक्त मुख्य सचिव कृषी, पशु संवर्धन व दुग्धविकास विभाग. ८) सीताराम कुंटे - प्रधान सचिव उच्च व तंत्रशिक्षण विभाग. ९) विजयकुमार - प्रधान सचिव कृषी व पशु संवर्धन विभाग. १०) सुधीरकुमार श्रीवास्तव - अतिरिक्त मुख्य सचिव परिवहन व बंदरे गृह विभाग. ११) मिता राजीव लोचन - प्रधान सचिव (वित्तीय सुधारणा) वित्त विभाग. १२) वंदना कृष्णा - प्रधान सचिव (लेखा व कोषागरे) वित्त विभाग. १३) व्ही.गिरीराज - प्रधान सचिव (व्यय) वित्त विभाग. १४) दीपक कपूर - प्रधान सचिव कौशल्य विकास व उद्योजकता विभाग. १५) महेश पाठक - प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा विभाग. १६) प्रभाकर देशमुख - सचिव ग्रामविकास व पंचायत राज, जलसंधारण. १७) डी.के.जैन - अतिरिक्त मुख्य सचिव वित्त. १८) एकनाथ डवले - सचिव रोजगार हमी योजना व जलसंधारण. १९) के.एच.गोविंदराज - विभागीय आयुक्त नाशिक २०) मालिनी शंकर - अतिरिक्त मुख्य सचिव मदत व पुनर्वसन, महसूल व वनविभाग. २१) सतीश गवई - प्रधान सचिव पर्यावरण विभाग. २२) आय.एस.चहल - प्रधान सचिव जलसंपदा विभाग. २३) एस.के.बागडे - सचिव सामाजिक न्याय विभाग. २४) तुकाराम मुंढे - महापालिका आयुक्त; नवी मुंबई. २५) संपदा मेहता - जिल्हाधिकारी अहमदनगर. २६) सुमित मलिक - पाणीपुरवठा व स्वच्छता. (विशेष प्रतिनिधी)मुख्य सचिवांचे कौशल्यया महाबदल्यांचा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांना मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्या प्रशासकीय कौशल्याचा फायदा झाला. वित्त विभागाचे सर्व टॉप बॉस बदलण्यात आले. तेथे नव्या दमाची टीम आली आहे. च्कृषी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले भगवान सहाय यांना कृषी विभागत नेण्यात आले. अर्थशास्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या वंदना कृष्णा यांना वित्त विभागात संधी देण्यात आली. नाशिक विभागात जलयुक्त शिवारमध्ये उत्कृष्ट कार्य करणारे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना रोहयो आणि जलसंधारणचे सचिव म्हणून आणले. च्आधीचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात असलेले आशिषकुमार सिंह यांना सार्वजनिक बांधकाम विभागात संधी देण्यात आली. एमपीएससीतून आयएएसमध्ये पदोन्नती मिळालेल्या १६ अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेचे सीईओ वा छोट्या महापालिकांचे आयुक्त म्हणून पाठविण्यात आले. त्यांना मंत्रालयात जबाबदारी दिली जाणार नाही, हे आधीच स्पष्टपणे सांगण्यात आले. जोशी, कुशवाह मुंबईत>मुंबई शहरच्या जिल्हाधिकारीपदी ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांना नियुक्ती देण्यात आली. सध्याच्या जिल्हाधिकारी शैला ए. यांना मुंबईतच विक्री कर विभागात पाठविण्यात आले आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह हे मुंबई उपनगरचे नवे जिल्हाधिकारी असतील. सध्याचे जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांना फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमण्यात आले आहे.
सर्वांत मोठा प्रशासकीय खांदेपालट, ७३ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Updated: April 28, 2016 05:02 IST