शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

कोल्हापूरात पूरस्थिती, पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली

By admin | Updated: July 13, 2016 09:24 IST

मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे कोल्हापूरात पंचगंगा नदीला पूर आला असून, पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

ऑनलाइन लोकमत 

कोल्हापूर, दि. १३ - मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे कोल्हापूरात पंचगंगा नदीला पूर आला असून, पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थिती गंभीर झाल्याने एनडीआरएफची पथक कोल्हापूरात दाखल झाली  आहेत.  
 
एनडीआरएफच्या ४० जवानांचे पथक सहा बोटींमधून दाखल झाले आहे. राधानगरी, शाहुवाडी, गगनबावडा परिसरात पूरपरिस्थिती आहे. पंचगंगेच्या पुरामुळे ८० गावांशी संपर्क तुटला आहे. 
 
चंदगड तालुक्याशी संपर्क तुटला आहे. नरसोबाच्या वाडीच मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. कोल्हापूर आणि कोकणाला जोडणारा मार्ग बंद झाला आहे.कोल्हापूरातील ७० हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 
 
सुमारे शंभराहून अधिक गावांचा, तसेच तळकोकणाशी कोल्हापूरचा संपर्क तुटला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाला (एनडीआरएफ) पाचारण करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पुराच्या पाण्याची तीव्रता अधिक असून, संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळा, महाविद्यालये, बॅँकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
 
सलग चार दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा दिलेला आहे. पंचगंगा, भोगावती, कडवी, वेदगंगा, वारणा, दूधगंगा, आदी नद्यांवरील तब्बल ७० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. विशेषत: पश्चिमेकडील गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी, करवीर तालुक्यांतील अनेक मार्ग बंद झाल्याने व या गावांचा संपर्क तुटल्याने शाळा, महाविद्यालये, बॅँकांचे कामकाज ठप्प राहिले; तर अनेक ठिकाणी पावसाचा जोर लक्षात घेऊन शाळा दुपारीच सोडण्यात आल्या.
 
कुडित्रे ते सांगरूळ मार्गावर कुंभी नदीचे पाणी आल्याने सांगरूळ परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे. कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर बालिंगे-दोनवडे दरम्यान, लोंघे, साळवण, मुटकेश्वर येथे पाणी आल्याने तळकोकणाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. त्यामुळे दूध, भाजीपाल्यासह अन्य वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचबरोबर पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी नावेतून वाहतूक सुरू आहे. धरणक्षेत्रांत धुवाधार कायम आहे. राधानगरी धरणक्षेत्रात चोवीस तासांत तब्बल २७०, तुळशी परिसरात ३४०, तर कुंभी धरणक्षेत्रात ३६० मिलिमीटर इतका उच्चांकी पाऊस झाल्याने पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी ६२ टक्के, वारणा ५३ टक्के, तर दूधगंगा धरण ३१ टक्के भरले आहे. जिल्ह्णातील लहान-मोठे बंधारे ओसंडून वाहत आहेत.
 
पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्याने सतर्कतेचा भाग म्हणून प्रशासनाने एनडीआरएफच्या (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) ४२ सैनिकांच्या तुकडीला पाचारण केले असून, त्याशिवाय ‘जीवनज्योती’चे १० जवान सज्ज आहेत.
 
प्रशासन सतर्क
 
पावसाचा जोर वाढल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, त्यांनी विविध सामाजिक संस्था, सहकारी संस्थांकडे मदतीची मागणी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘गोकुळ’ने दोन बसेस मदतीसाठी तैनात केल्या.
 
‘गोकुळ’च्या संकलनावर परिणाम
 
पुराच्या पाण्याने करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी तालुक्यांतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्याचा परिणाम दूध वाहतुकीवर झाला असून ‘गोकुळ’चे दूध संकलन सुमारे वीस हजार लिटरनी कमी झाले आहे.
 
आपत्काळात नागरिकांनी येथे संपर्क साधावा -आपत्ती व्यवस्थापन विभाग, कोल्हापूर.
 
१०७७ (टोल फ्री), (०२३१) २६५९२३२, २६५२९५०, २६५२९५३, २६५२९५४.
 
काय आहे एनडीआरएफ ?
 
ओरीसामध्ये १९९९ ला चक्री वादळाचा तडाखा बसला. त्यानंतर २००१ ला गुजरातमध्ये मोठा भूकंप झाल्यानंतर अशा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीचे निवारण करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एकादे दल असायला हवे. असा विचार पुढे आला. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण स्थापन करण्याची सूचना केली. या प्राधिकरणावर तज्ञ सदस्य म्हणून शरद पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या चर्चेतून २६ डिसेंबर २००५ मध्ये हा कायदा अस्तित्वात आला . त्यातून नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एन. डी. आर एफ) ची स्थापना झाली. या दलाचा भारतीय लष्कराशी तसा कोणताही थेट संबंध नाही. पॅरामिलीटरी कोर्स म्हणून ओळÞख असलेल्या केद्रीय राखीव दल किंवा सीमा सुरक्षा दल यातील जवानांमध्ये हा फोर्स आकाराला आला आहे. त्याचे नियंत्रण केंद्रीय गृहमंत्रालयाकडे आहे. परंतु या दलाचा वापर कुठे करायचा याचा निर्णय राज्यसरकार घेते. देशात नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती येणारे संभाव्य प्रदेश म्हणून यांची ओळख आहे. अशा दहा शहरात एनडीआरएफच्या बटालियन आहेत. महाराष्ट्रात पुणे व नागपूरला यांची बटालियन आहे. प्रशिक्षित जवानाशिवाय तंत्रज्ञ आणि वैद्यकीय मदत देण्याची क्षमता या बटालियनकडे आहे.
 
जुलैची सरासरी ओलांडली!
 
शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, कागल, गडहिंग्लज या तालुक्यांनी जुलै महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडली आहे. १२ तारखेपर्यंतच जिल्ह्याने जुलै महिन्याची सरासरी ९१.५९ टक्के पूर्ण केली आहे.
 
बसेस अडकल्यापावसाचा जोर वाढल्याने पाणीपातळी त्याच पटीत वाढत गेली. प्रवासी घेऊन जाताना पाणी नव्हते; पण प्रवासी सोडून परत येईपर्यंत रस्त्यांवर पाणी आल्याने एस. टी. महामंडळाच्या बसेस अनेक ठिकाणी अडकून पडल्या आहेत.
 
२००५ ची पुनरावृत्ती शक्य
 
कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश धरणे अद्याप भरलेली नाहीत; तरीही शेतजमीन सततच्या पावसाने उगळल्याने पावसाचा थेंबन्थेंब वाहून नदीला येत असल्याने महापुराची स्थिती उद्भवली आहे. यापूर्वी २००५ मध्ये २६ जुलैला महापूर आला होता. त्याच दिवशी रंकाळाही ओसंडून वाहत होता.
 
पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट, तर धोक्याची पातळी ४३ फूट आहे. मंगळवारी रात्री ११ वाजता पाण्याची पातळी ४४.१ फूट इतकी होती. धरणक्षेत्रात होत असलेला सगळा पाऊस धरणांत अडविला जात आहे; कारण धरणे अजून भरलेली नाहीत.
 
पावसाचा असाच तडाखा राहिला तर जिल्ह्यातील सगळी धरणे शनिवार (दि. १६) पर्यंत भरतील. त्यामुळे पाण्याची पातळी वाढणार
 
आहे. ऑगस्ट २००५ मध्ये पंचगंगेची पाणी पातळी ४५.११ फुटांपर्यंत गेली होती.