नांदेड : काँग्रेसचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी अखेर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह अन्य सर्व जबाबदा:यांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना गुरुवारी पाठविला़ सुमारे 35 ते 4क् वर्षापासून पक्ष कार्यकर्ता ते संसद सदस्य असा प्रदीर्घ राजकीय प्रवास केला़ त्याचवेळी राजीनाम्याचा निर्णय कळविताना खेद वाटतो, परंतु पक्षांतर्गत पातळीवर निर्माण केली गेलेली परिस्थिती लक्षात घेता माङया दृष्टीने हा निर्णय अपरिहार्य झाला आहे, असे त्यांनी पत्रत म्हटले आहे.