शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

वेडात दौडल्या ‘करवीर कन्या’ सात..!-लेह- लडाखची खडतर सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 20:36 IST

कोल्हापूर : एकीकडे उंचच उंच कडे, दुसºया बाजूला खोल दºया, क्षणाक्षणाला बदलणारे वातावरण, तुटलेले रस्ते, रस्त्यांतूनच वाहणारे पाणी... अशा खडतर परिस्थितीत कोल्हापूरच्या सात करवीरकन्यांनी

ठळक मुद्देस्कूटरवरून १५०० किलोमीटर प्रवासतिरंग्याला सलाम करताना आमचा ऊर भरून आला प्रवासात हिमवर्षाव सुरू झाला आणि सर्वांनाच वेगळा अनुभव मिळाला.मात्र या धाडसी महिलांनी जिद्दीने ही मोहीम पूर्ण केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : एकीकडे उंचच उंच कडे, दुसºया बाजूला खोल दºया, क्षणाक्षणाला बदलणारे वातावरण, तुटलेले रस्ते, रस्त्यांतूनच वाहणारे पाणी... अशा खडतर परिस्थितीत कोल्हापूरच्या सात करवीरकन्यांनी मनाली, लेह, लडाख, सियाचीन, कारगील असा १५०० किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास केला आणि तोही विदाउट गिअर स्कूटरने! आतापर्यंत मुख्यत: बुलेटवरून हा प्रवास पुरुष करत होते परंतू विदाऊट गिअरच्या गाड्या व महिलांनी ही सफर पहिल्यांदाच धाडसाने पूर्ण केली.

शहीद फौजदार राजू जाधव मेमोरिअल फाउंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त या साहसी प्रवास मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. फाउंडेशनचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जाधव, योगगुरू अरुण बेळगावकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आखण्यात आली होती. २ आॅगस्ट ते १८ आॅगस्ट २०१७ या कालावधीत ही मोहिम झाली. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या साहसी मोहिमेची माहिती देण्यात आली.

उद्यान रचनाकार शरयू पै, सांगली जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील, चैत्रा राजू राऊत,आर्किटेक्चरचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या जुईली शिरोडकर, वैशाली कुलकर्णी,अकौंटचे काम करणाºया उल्फत मुल्ला, डॉ. उज्ज्वला लाड, या सातजणींनी हा भीमपराक्रम करून दाखविला.

हिमाचल प्रदेशातील मंडी येथून या मोहिमेचा प्रारंभ झाला. मनालीतील वास्तव्यानंतर १३ हजार फूट उंचीवरील रोहतांग पासकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. चंद्रा व भागा नद्यांचा संगम ते पांग हा १६४ किलोमीटरचा खडतर प्रवास पूर्ण करून १६ हजार ४६५ फूट उंचीवरील लाचुंगलाकडे त्यांनी प्रयाण केले. यानंतरच्या प्रवासात हिमवर्षाव सुरू झाला आणि सर्वांनाच वेगळा अनुभव मिळाला. यानंतर लेह, सियाचीन ते परत श्रीनगर या प्रवासामध्ये या सर्वांना निसर्गाची विविध रूपं पाहायला मिळाली.

वारा आणि बर्फवर्षाव यांमुळे मातीच्या ढिगाºयांनी धारण केलेले वेगवेगळे आकार, आकाशामध्ये विविध रंगांच्या छटांचे ढग हे या सर्वांनाच खडतर प्रवासामुळे झालेले श्रम विसरायला लावत होते.या मोहिमेचे मार्गदर्शक अरुण बेळगावकर म्हणाले, आमच्यासोबतच्या या सात महिला लेह, लडाख, सियाचीन परिसरात स्कूटरने प्रवास करणार आहेत, याची माहिती मिळालेले सर्वजण आम्हांला वेड्यात काढत होते. या कमी सीसीच्या गाड्या घेऊन हे शक्य नसल्याचे ते सांगत होते. मात्र या धाडसी महिलांनी जिद्दीने ही मोहीम पूर्ण केली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जाधव म्हणाले, ‘मोहिमेच्या समारोपावेळी १५ आॅगस्टला आम्ही कारगील विजय स्मारकस्थळी उपस्थित होतो. कारगीलमध्ये शहीद झालेल्या सर्वांनाच अभिवादन करताना आणि दुसरीकडे फडक त्या तिरंग्याला सलाम करताना आमचा ऊर भरून आला होता. या मोहिमेमध्ये मेकॅनिकल महेश दैव, शार्दूल पावनगडकर, रणजित ढवळे, तुकाराम जाधव (कंदलगाव), अनिल शिरोडकर सहभागी झाले होते..राष्ट्रहिताच्या संदेशाचा प्रसारया मोहिमेमध्ये या सर्वांनीच बेटी बचाओ, स्वच्छ भारत - सुंदर भारत, सेव्ह द वॉटर या राष्ट्रहिताच्या संदेशांचाही प्रसार केला. याचेही या परिसरातील नागरिक आणि प्रवाशांनी तसेच लष्कराच्या जवानांनी कौतुक केले. जाधव यांना कंदलगावातील मुलींनी राख्या दिल्या होत्या. त्या त्यांनी जवानांनाआम्हीही करू शकतो!खडतर प्रवास, तोही स्कूटरवरून सुरू असल्याचे पाहून अनेक प्रवाशांनी आम्हांला सलाम केला. चाकोरीबाहेर जाऊनही प्रतिकूल परिस्थितीत आम्ही वेगळे काही करू शकतो, हा आत्मविश्वास या मोहिमेने दिल्याची प्रतिक्रिया या सर्वांनी व्यक्त केली.कोल्हापुरातील सात करवीर क न्यांनी आॅगस्ट महिन्यात मनाली, लेह, लडाखमध्ये स्कूटरवरून १५०० किलोमीटरचा प्रवास केला. अतिउंचावरील खारदुंगला पास (१८ हजार ३८० फूट) येथे पोहोचल्यानंतर सहभागी सर्वांनी असा आनंद व्यक्त केला.