शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
6
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
7
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
8
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
9
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
10
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
11
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
12
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
13
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
14
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
16
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
17
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
18
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
20
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!

कोयनेचे पाणी मुंबईपर्यंतही नेणे शक्य

By admin | Updated: February 24, 2015 00:00 IST

रवींद्र वायकर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला गती देण्याचे आश्वासन

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला गती देणे तसेच महामार्गावरील कशेडी बोगद्याचे काम तातडीने सुरु करणे ही कामे सर्वोच्च प्राधान्याने करण्यात येतील, असा निर्धार गृहनिर्माण, उच्च, तंत्रशिक्षणमंत्री व पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. त्याचप्रमाणे कोयनेतील पाणी रत्नागिरी, रायगड, एवढेच नव्हे तर मुंबईपर्यंतही नेणे शक्य आहे, असे प्रतिपादन वायकर यांनी केले.विकास कार्यक्रमांना गती देणे तसेच तालुकास्तरावर नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी वायकर हे सोमवारी चार दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. या जिल्हा दौऱ्यात ते रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवरुख-संगमेश्वर, गुहागर येथे तालुकास्तरीय जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवणार आहेत. तत्पूर्वी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील विविध विकास योजनांच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. बैठकीत जिल्ह्यातील रस्ते विकास तसेच सिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरणावर प्रामुख्याने भर देण्यात आला. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.वायकर म्हणाले की, मुंबई - गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या मार्गाचे चौपदरीकरण तातडीने होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीची मोजणी, भूसंपादनासह येणारे सर्व अडथळे दूर केले जातील. त्यासाठी अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने आणि समन्वय ठेवून काम करावे, अशी सूचना केली. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या जमीन सीमांकनाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जमीनमोजणी आणि भूसंपादनाच्या प्रक्रियेत निधीची उपलब्धता किंवा धोरणात्मक अडचणी आल्यास त्या मंत्रालयस्तरावर तातडीने दूर करण्यात येतील, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिला.महामार्गाचे काम इंदापूर ते कशेडी, कशेडी ते ओझरखोल आणि ओझरखोल ते झाराप या तीन टप्यात सुरु असून, इंदापूर ते कशेडी हे अंतर ७७ किलोमीटरचे आहे. यापैकी १९ किलोमीटर रस्ता घाटातला असून, प्रस्तावित कशेडी बोगदा १.७२ किलोमीटरचा आहे. भविष्यातील वाहतूक वाढीचा विचार करुन येथे तीन पदरांचे दोन बोगदे असतील. यामुळे घाटातील वळणाचे अंतर कमी होईल. बोगद्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी रायगड जिल्ह्यातील भोगाव व कातळी, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी आणि खवटी या चार गावांमध्ये भूसंपादन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील कोयना, पोफळी, कोळकेवाडी आणि कोळकेवाडी टप्पा -४ या चार ठिकाणी कोयनेच्या पाण्यावर अनुक्रमे ४० मेगावॅट, ६०० मेगावॅट, ३२० मेगावॅट आणि १००० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. या १९६० मेगावॅट वीजनिर्मितीसाठी किमान ५०० ते कमाल ३ हजार एमएलडी पाणी सोडले जाते. या सोडलेल्या पाण्यापैकी अपवादवगळता जवळपास सर्व पाणी समुद्रात वाया जाते. पाण्याचा इतका मोठा अपव्यय अव्यवहार्य असून, त्यावर तोडगा काढला पाहिजे. या पाण्याचा वापर चिपळूण तालुका, तसेच रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील गावांना कसा करता येईल, याचा विचार सुरु आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील एकूण धरणांची संख्या, अपूर्ण धरणांची संख्या, कामे बंद असलेली धरणांची संख्या, धरणात उपलब्ध पाणीसाठा या सगळ्यांचा विचार करुन पाण्याचा वापर शेतीसाठी कसा वाढवता येईल, अधिकाधिक जमीन लागवडीखाली कशी आणता येईल, याचाही जलसंपदा, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचार करावा, असे त्यांनी बैठकीत सांगितले. (प्रतिनिधी)समिती स्थापणारजिल्ह्याची गरज भागवून उरलेले पाणी मुंबईसारख्या महानगराला उपलब्ध करण्याचाही विचार केला पाहिजे. ही पाणी वाहून नेण्याची योजना व्यवहार्य असून, राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून ती निश्चितपणे मार्गी लावण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.काम वेगाने सुरूकशेडी बोगद्याचे काम युद्धपातळीवर करण्याचा निर्धार.महामार्गाचे काम इंदापूर ते कशेडी, कशेडी ते ओझरखोल आणि ओझरखोल ते झाराप असे सुरु.१९ किलोमीटर रस्ता घाटातला असून, कशेडी बोगदा १.७२चा.कोयनेतील पाण्याचा वापर चिपळूण, तसेच रत्नागिरी व रायगडमधील गावांना कसा करता येईल, याचा विचार सुरु.