शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

गृहमंत्र्यांच्या विदर्भातच आयपीएसची पदे रिक्त

By admin | Updated: August 4, 2015 01:01 IST

गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री रणजीत पाटील हे दोघेही विदर्भातले असूनही त्याच विदर्भात भारतीय

यवतमाळ : गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री रणजीत पाटील हे दोघेही विदर्भातले असूनही त्याच विदर्भात भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. शिवाय साईड ब्रँचला तर तपासाला अधिकारीच नाहीत, अशी स्थिती आहे.गडचिरोली वनपरिक्षेत्राला पोलीस उपमहानिरीक्षक नाहीत. नक्षलविरोधी अभियानाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांची जागा रिक्त आहे. नागपूर आयुक्तालयात अपर पोलीस आयुक्त (दक्षिण), अपर पोलीस आयुक्त गुन्हे, अहेरी पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक सीआयडी क्राइम, अपर पोलीस अधीक्षकाच्या (गुन्हे) दोन जागा रिक्त आहेत. नागपूर विभागात राज्य गुप्तवार्ता विभागाला पोलीस अधीक्षक नाहीत.अशीच अवस्था अमरावती विभागात आहे. रविवारपर्यंत या परिक्षेत्राला पूर्णवेळ विशेष पोलीस महानिरीक्षक नव्हते. पुण्याचे महानिरीक्षक (मोटर परिवहन) चंद्रकांत उघडे यांच्याकडे त्यांच्या सोयीने सेवानिवृत्तीपर्यंत अतिरिक्त प्रभार ठेवला गेला. आता तेथे पुण्यातून संजीवकुमार सिंघल यांची पूर्णवेळ विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.अमरावती विभागात उपअधीक्षकाच्या अनेक जागा रिक्त आहेत. कर्मचारी कल्याण, खातेनिहाय चौकशी या जागांवर तर सहसा पूर्णवेळ पोलीस निरीक्षक मिळत नाहीत. खुद्द महानिरीक्षकांना अनेकदा रिडरसाठी प्रतीक्षा करावी लागते. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला अमरावतीत केवळ दोन अधिकारी आहेत. त्यातील एकाकडे यवतमाळचा अतिरिक्त प्रभार आहे. यवतमाळमध्येही गेल्या कित्येक वर्षांपासून अर्धा डझन गुन्ह्याचे तपास प्रलंबित आहेत. हीच अवस्था पाचही जिल्ह्यांत आहे. राज्य गुप्तवार्ता विभागात १० वर्षांहून अधिक काळापासून पूर्णवेळ सहायक उपायुक्तपद भरले गेलेले नाही.रिक्त जागांमुळे उपलब्ध यंत्रणेवरील कामाचा ताण वाढतो आहे. त्यातून गणेशोत्सव, नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक उत्सव तोंडावर असल्याने आणखी बंदोबस्ताचा ताण वाढणार आहे. त्यामुळे ही रिक्त पदे भरली जाणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)