शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

सलग दुसऱ्यांदा सुनीत ठरला ‘भारत श्री’

By admin | Updated: March 6, 2017 05:01 IST

सुनीत जाधवने आपल्या लौकिकास साजेसे अप्रतिम प्रदर्शन करताना सलग दुसऱ्यावर्षी भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली

मुंबई : पीळदार शरीरयष्टीच्या महाराष्ट्रीयन सुनीत जाधवने आपल्या लौकिकास साजेसे अप्रतिम प्रदर्शन करताना सलग दुसऱ्यावर्षी भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली. महिला गटात मणिपूरच्या सरिता थिंगबैजमने पुन्हा एकदा बाजी मारली. दरम्यान, सांघिक गटात बलाढ्य रेल्वेने वर्चस्व कायम राखले असून महाराष्ट्र आणि सेनादलाला संयुक्तपणे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.गुरगाव येथील लेझर व्हॅलीत झालेल्या या स्पर्धेत प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली. शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत रेल्वेच्या खेळाडूंचा भरणा अधिक होता. गतविजेत्या सुनीतसह राम निवास, जावेद अली खान, महेश्वरन आणि सर्बो सिंग यांच्यामध्ये रंगतदार लढत झाली. सात पोजेसनंतर सुनीत आणि राम निवासचे गुण समान झाले. अखेर कंपेरिझनमध्ये सुनीतने बाजी मारत ‘चॅम्पियन्स आॅफ चॅम्पियन’ पुरस्कारावर कब्जा केला.रामनिवासला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले, तर तिसरा क्रमांक सेनादलाच्या दयानंद सिंग याने मिळविला. बेस्ट पोझरचा पुरस्कार सर्बो सिंगने पटकावला. मुंबई श्री विजेता अतुल आंब्रेला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सांघिक गटात रेल्वेच्या १२ खेळाडूंपैकी ९ खेळाडूंनी पदकांवर नाव कोरले. या कामगिरीच्या जोरावर रेल्वेने ८५ गुण मिळवित सांघिक विजेतेपदाला गवसणी घातली. महाराष्ट्र संघाने दोन सुवर्ण पदकांसह दोन रौप्य जिंकले आणि सेनादलाने २ सुवर्ण आणि ४ कांस्य जिंकत ४५ गुण मिळवले. या दोन्ही संघांची गुणसंख्या समान असल्याने दोघांना संयुक्त सांघिक उपविजेत्याचा मान देण्यात आला. (क्रीडा प्रतिनिधी)>सरिता देवी अव्वलमहिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत मणिपूरच्या सरिता देवीने पुन्हा मिस इंडिया होण्याचा बहुमान संपादला. दिल्लीची ममोता यमनम दुसरी आली. महाराष्ट्राच्या कांची अडवाणी आणि लीला फड यांना चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरच राहावे लागले.>वजनी गटनिहाय निकाल५५ किलो : १. नितीन म्हात्रे (महाराष्ट्र), २. पुंदन गोपे ( रेल्वे), ३.. अरूण साहू (सेनादल)६० किलो : १. प्रदीप वर्मा (पंजाब), २. वैभव महाजन (रेल्वे), ३. रामा मलिक (हिमाचल प्रदेश)६५ किलो : १. अनिल गोचीकर (ओडिशा), २. एस. भास्करन (रेल्वे), ३. संदीप (नवी दिल्ली)७0 किलो : १. राजू खान (नवी दिल्ली), २. हरी राम (सीआरपीएफ), ३. अरनॉल्ड फज (प.बंगाल)७५ किलो : १. सर्बो सिंग (रेल्वे), २. सागर कातुर्डे (महाराष्ट्र), ३. प्रशांत कन्नुकर (सेनादल)८0 किलो : १. बी.महेश्वरन (सेनादल), २. मोहन सुब्रमण्यम (रेल्वे), ३. आर.के.मलिक (सेनादल)८५ किलो : १. दयानंद सिंग (सेनादल), २. प्रीतम चौगुले (रेल्वे), ३. श्रीकांत सोम (उत्तर प्रदेश)९० किलो : १. सुनीत जाधव (महाराष्ट्र), २. सागर जाधव (रेल्वे), ३. राजेंद्रन मणी (तामिळनाडू)९0 ते १०० किलो : १. राम निवास (रेल्वे), २. किरण पाटील (रेल्वे), ३. एस.के.शुक्ला (सेनादल)१०० किलोवरील : १. जावेद अली खान (रेल्वे), २. झुबेर शेख (महाराष्ट्र), ३. पवन कुमार (गुजरात)