शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

घर बांधायचे कसे

By admin | Updated: July 18, 2014 01:13 IST

मालकीचे घर असावे, असे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते. मात्र सध्या बांधकाम साहित्याचे भाव गगनाला भिडल्याने मध्यमवर्गीयांचे स्वप्न पूर्णत्वास येईल की नाही, अशी शंकाच निर्माण झाली आहे.

साहित्याच्या किमतीत वाढ : मध्यमवर्गीयांना चिंतानागपूर : मालकीचे घर असावे, असे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते. मात्र सध्या बांधकाम साहित्याचे भाव गगनाला भिडल्याने मध्यमवर्गीयांचे स्वप्न पूर्णत्वास येईल की नाही, अशी शंकाच निर्माण झाली आहे. घर बांधकामासाठी आवश्यक असणारे सिमेंट, रेती, वीट, सळाक, गिट्टी, लाकडी व लोखंडी दरवाजे यांच्या बरोबरच बांधकामावर काम करणारे मिस्त्री व मजुरांचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत. बांधकामाच्या बजेटमध्ये सव्वा ते दीडपटीने वाढ झाल्याने अनेकांनी बांधकाम बंद केल्याची माहिती आहे. मागील काही महिन्यांपासून नवीन घर बांधण्याचा विचारच सामान्य माणसाला स्वप्नवत वाटू लागला आहे.इतर साहित्यही महागलेसिमेंट, सळाख, रेती, गिट्टी, विटा, टाईल्स, प्लंबिंग साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स फिटिंगचे साहित्यही महागले आहेत. त्याचा बांधकामावर परिणाम झाला आहे. वर्षभरातच बांधकामाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. एकंदरीतच बांधकामाच्या साहित्याच्या वाढलेल्या किंमती पाहून सर्वसामान्य माणसाला घर बांधणे कठीण झाले आहे. महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे स्वप्नच मोडीत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेती ८,००० रुपये ट्रकरेतीची किंमती दुपटीवर गेली आहे. रेतीचा एक ट्रक (२५० फूट रेती) आठ हजारांच्या घरात गेल्याने सर्वसामान्य माणसासोबतच बांधकाम व्यावसायिकांनादेखील जबर फटका बसला आहे. गेल्यावर्षी १६ ते १८ रुपये प्रति घनफूट असणारे रेतीचे दर आता थेट ३२ ते ३५ रुपयांवर गेल्याने बांधकामाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. विटा ५२५० रु. हजारघराच्या भिंती उभ्या करण्यासाठी विटांची गरज असते. सध्या विटांचे दर सर्वोच्च स्थानी पोहोचले असून गेल्यावर्षभरात २५ टक्के वाढ झाली आहे. आज १००० विटांसाठी ५२५० रुपये मोजावे लागत आहेत. बांधकामाचे इतर साहित्य वाढताच वीट उत्पादकही हळूच दरवाढ करतात.सिमेंट३२० ते ३८० रु. पोतेजून महिन्याच्या तुलनेत सध्या ९० ते १२० रुपये प्रति बोरे (५० किलो) अशी वाढ होऊन किंमत ३८० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. भांडवलशाहीचे हे मोठे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया बिल्डर्सनी लोकमतशी बोलताना दिली. सिमेंटच्या वाढीव दरामुळे बांधकामाची किंमत वाढली आहे.गिट्टी ६५०० रु. ट्रकक्युबिक फूटमध्ये मिळणाऱ्या गिट्टीचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या दर २४ ते ३० रुपये क्युबिक फूट आहे. सुरू असलेले बांधकाम आणि मागणीनुसार विक्रेते गिट्टीचे दर ठरवितात. सिमेंट वाढल्याने गिट्टीचे दर वाढू शकतात, अशी शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली. सळाक ४५ रु. किलोघराच्या बांधकामात सळाख हा तेवढाच महत्त्वाचा घटक आहे. सळाखीच्या दराची तीच स्थिती आहे. जूनच्या महिन्याच्या तुलनेत प्रति टन ५ हजाराची वाढ होऊन दरपातळी ४५ हजारांवर गेली. वर्षभरात झालेली भाववाढ पाहून सर्वसामान्य पुरता बेजार झाला आहे.