शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

राज्य सरकारचे पुनश्च हरिओम, पहिला दिवस रांगेचा अन् गर्दीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 08:41 IST

पुनश्च हरिओमच्या तिसºया टप्प्याला सोमवारी दहा टक्के मनुष्यबळाने कार्यालये सुरू झाली.

मुंबई/ ठाणे/ पालघर/ नवी मुंबई/ अलिबाग : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन-अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळ लॉकडाऊनमध्ये काढल्यानंतर सोमवारपासून ‘अनलॉक’चा पुढचा टप्पा सुरू झाला. मात्र सार्वजनिक वाहतुकीची पुरेशी सोय नसल्याने कार्यालये गाठण्यासाठी निघालेल्यांचे अतोनात हाल झाले. सकाळपासूनच ठिकठिकाणी गर्दी, लांबचलांब रांगा आणि वाहतूककोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागला.

मुंबईच्या जनजीवनाने कोरोनापूर्व काळ गाठला. लोकल वाहतूक, शॉपिंग मॉल व प्रार्थनास्थळे बंद होती, हाच अपवाद आजच्या गर्दीत होता. मास्कचा अपवाद वगळता नेहमीची लगबग, घाई, वाहतूककोंडी, गर्दीचे चित्र मुंबईसह उपनगरांत व ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. मुंबईत कामासाठी येताना दोन ते पाच तास लावाव्या लागलेल्या रांगा, नंतर वाहतूक कोंडी व घरी परतताना पुन्हा त्याच स्थितीत अडकून नोकरदारांचे हाल झाले. रेल्वे वाहतूक बंद असल्याने रस्ते वाहतुकीच्या मर्यादांमुळे अनेकांना कार्यालयात पोहोचण्यासाठी पाच ते सात तास कसरत करावी लागली. ठाणे, डोंबिवली, कल्याण ते कर्जत, कसारा, भार्इंदर, वसई-विरार, पनवेल, नवी मुंबई या परिसरातून मुंबईकडे येणारे मेटाकुटीला आले. एसटी, परिवहन सेवा, खासगी टॅक्सी या अपुऱ्या पडल्या. पुनश्च हरिओमच्या तिसºया टप्प्याला सोमवारी दहा टक्के मनुष्यबळाने कार्यालये सुरू झाली. खासगी व प्रवासी वाहनांना परवानगी आहे.

अपेक्षित उपस्थिती नाहीनवी मुंबईकरांनीही बसची संख्याही कमी असल्यामुळे खासगी वाहनांना प्राधान्य दिले. तर नवी मुंबईतील अनेक कार्यालयांमध्येही बाहेरून येणाºया अनेकांना पोहोचण्यात अडचणी आल्या. त्यामुळे येथील कार्यालयांमध्ये अपेक्षित उपस्थिती नव्हती.ठाण्यात वाहनांची, डोंबिवलीत प्रवाशांची रांगठाणे जिल्ह्यातील अनेकांना खासगी वाहनाने मुंबई गाठावी लागली.त्यामुळे सकाळी ७ ते १० दरम्यान पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर टोलनाका परिसरात मुंबई व ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे दिवा, कल्याण-डोंबिवली आदी ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत बससेवा तोकडी पडल्याचे पाहायला मिळाले.बस पकडण्यासाठी डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकात कर्मचाºयांची सुमारे दोन किलोमीटरपर्यंत रांग लागली होती. बसमध्ये चढण्यासाठी अनेकांना दोन ते पाच तास रांगेत उभे राहावे लागल्याने त्यांचे हाल झाले. या रांगातही सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला. मीरा रोड- भार्इंदरमध्येही अशाच रांगा पाहायला मिळाल्या.बससाठी चढाओढबसथांब्यावर शारीरिक अंतर पाळणारे मुंबईकर बसमध्ये चढताना मात्र नेहमीप्रमाणे झुंबड करत असल्याचे ठिकठिकाणी दिसून आले. कोरोनापूर्व काळातील सवयीप्रमाणे झटापट, धक्काबुक्की करतच बसचे स्वागत होत असल्याचे पाहायला मिळाले.वसई-विरारमध्ये सकाळपासूनच झुंबडवसई-विरारमधून मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांची सकाळपासूनच झुंबड उडाली होती. विरार, नालासोपारा तसेच वसई येथून मुंबईला जाणाºया एसटी बसकरिता काही किलोमीटरच्या रांगा लागल्याने प्रवाशांना अनेक तास ताटकळत उभे राहावे लागले. दरम्यान, या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडालेला दिसला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई