शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

पुणे, कोल्हापुरात जोरदार पाऊस

By admin | Updated: October 11, 2016 05:32 IST

गालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गोवा, आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पुणे

पुणे : बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गोवा, आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूरसह काही भागांत सोमवारी जोरदार पाऊस झाला. येत्या २४ तासांत दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़

नैर्ऋत्य मोसमी पाऊस उत्तर भारताच्या आणखी भाग आणि मध्य व पश्चिम भारताच्या काही भागातून माघारी परतण्यासाठी अनुकूल स्थिती आहे़ साधारणपणे १५ आॅक्टोबरपर्यंत मान्सून संपूर्ण उत्तर भारत, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा येथून माघारी परततो़ यंदा आतापर्यंत तो राजस्थान, उत्तर भारताचा काही भाग, मध्य भारतातील काही भागातून माघारी आला आहे़ त्यामुळे पुढील आणखी काही दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे़ पुण्यात सायंकाळी पाऊण तास जोरदार पाऊस झाला असून, पुणे वेधशाळेकडे २७ मिमी पावसाची नोंद झाली.कोल्हापूर शहरातही सायंकाळी जोरदार पाऊस झाला. गेल्या २४ तासांत कोकणातील रत्नागिरी, सावंतवाडी ८०, राजापूर, ७० मिमी पावसाची नोंद झाली़ मध्य महाराष्ट्रातील राधानगरी ७०, कराड ४०, आजरा, गगनबावडा, गारगोटी, खंडाळा बावडा, पुणे (लोहगाव), शिरूर, घोडनदी २० मिमी पाऊस झाला़ मराठवाड्यातील भूम येथे १० मिमी पाऊस झाला़ (प्रतिनिधी)