शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
2
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
3
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
4
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
5
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
6
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
7
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
8
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
9
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
10
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
11
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
12
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
13
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
14
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
15
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
16
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
17
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
18
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
19
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
20
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?

राज्यातील कुपोषणाकडे शासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: August 26, 2016 01:04 IST

बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण वाढले असून, शासनाकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जनआरोग्य अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी केला

पुणे : राज्यातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण वाढले असून, शासनाकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जनआरोग्य अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. डॉ. अभिजित मोरे, अ‍ॅड. बंडू साने व डॉ. सुहास कोल्हेकर यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील बालकांच्या कुपोषणाविषयी माहिती दिली. राज्यात अनेक मुले कमी वजनाची भरत असून, ते बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. २०१५-१६ या वर्षात राज्यात ८३ हजार ६८ मुले गंभीररीत्या कमी वजनाची असून मध्यम कमी वजनाच्या मुलांची संख्या ५ लाख ६३ हजार ३१० इतकी आहे. राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आकडेवारीवरून हे चित्र स्पष्ट झाले आहे. कुपोषित असणारी बहुतांश मुले झोपडपट्टी, आदिवासी आणि ग्रामीण भागातील असल्याचेही या अहवालावरून स्पष्ट होत असल्याचे डॉ. कोल्हेकर म्हणाले. या कुपोषित मुलांसाठी असणारी ग्राम बाल विकास केंद्रे, बाल उपचार केंद्रे, पोषण पुनर्वसन केंद्रे तत्काळ सुरू करण्याची आवश्यकता आहे.राज्यातील पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूची संख्या मागील वर्षी ४,१०१ होती; मात्र ती आता या वर्षी ही संख्या वाढली असून ४,९१३ इतकी झाली आहे. याचबरोबर राज्यात २०१४पासून आतापर्यंत ३९,९५९ अर्भक मरण पावले आहेत, तर ३८,१४४ उपजत मृत्यू झाल्याचे कुटुंबकल्याणकडून मिळालेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. गंभीररीत्या वजन कमी झालेल्या बालकांचे प्रमाण नाशिकमध्ये जास्त असून २०१५-१६ या वर्षात ६,४०४ बालकांची यामध्ये नोंद झाली आहे. तर, त्याखालोखाल जळगावमध्ये ४,४६८ आणि अमरावती येथे ३,५९८ बालकांचे वजन गंभीररीत्या कमी झाल्याचे आढळले आहे. (प्रतिनिधी)>जनआरोग्य अभियान संघटनेतर्फे माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती राज्याच्या कुटुंबकल्याण विभागाकडे मागविण्यात आली होती. मुलांच्या विकासासाठी चांगले पोषण होण्याची आवश्यकता असून जन्मापासून सहा वर्षांपर्यंतचा काळ बालकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. मात्र, याबाबत शासन पुरेशा गांभीर्याने व सातत्याने काम करीत नसल्याची टीकाही संघटनेने केली आहे. शासनाकडे असणाऱ्या अपुऱ्या निधीमुळे गावपातळीवरील बालकांच्या उपचारांसाठी चालवली जाणारी ग्राम बालविकास केंद्रे २०१५पासून बंद करण्यात आली असून, ती त्वरित चालू करण्यात यावीत, अशी मागणीही संघटनेतर्फे करण्यात आली आहे.