शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

शिक्षणाच्या कमी संधी मिळूनही मुलांपेक्षा मुलीच हुशार : देशमुख

By admin | Updated: March 6, 2017 03:50 IST

मुलगा-मुलगी समान असे म्हणत असलो तरी ही समानता मात्र शिक्षणात दिसत नाही.

ठाणे : मुलगा-मुलगी समान असे म्हणत असलो तरी ही समानता मात्र शिक्षणात दिसत नाही. कमी संधी मिळूनही मुली या मुलांपेक्षा हुशारच असतात. पदव्युत्तर अभ्यासक्रमात ५० टक्क्यांहून अधिक मुली आहेत. आता प्रशासकीय सेवेत जास्तीत जास्त मुलींनी यावे. या सेवेत त्यांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे आवाहन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी केले. आठव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलमनाचा समारोप सोहळा रविवारी गडकरी रंगायतन येथे पार पडला. त्यात ते बोलत होते. या सोहळ््याला संमेलनाध्यक्ष आणि माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, स्वागताध्यक्ष निरंजन डावखरे, सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त शामसुंदर पाटील, आरटीओ जितेंद्र पाटील, डॉ. आनंद पाटील, व्हॅटचे उपायुक्त अजय वैद्य, वनाधिकारी रंगनाथ नाईकडे, वैशाली पाटील, संतोष पाटील आदी उपस्थित होते. राजकारणात आलेल्या मुली आणि प्रशासकीय सेवेतील महिला अधिकारी यांचे काम प्रेरणादायी आहे. स्पर्धा परीक्षेत पास होणारच या उद्देशाने अभ्यास केला, तर यश नक्कीच मिळेल. या क्षेत्रात समाजसेवेसाठी जाणीवपूर्वक यायला हवे. तरुणांची पिढी समाजसेवेत येत आहे आणि त्याला कौतुकाची दादही मिळत आहे, असे मार्गदर्शन देशमुख यांनी केले.स्वागताध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी मुंबई विद्यापीठाने एमपीएससीचेही विद्यापीठ उभारावे, अशी मागणी केली होती. असे कायमस्वरुपी विद्यापीठ उभारण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. कोणताही संकोच न बाळगता प्रयत्न करत राहा. सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे. मेहनत करा. जीवनात यशस्वीरित्या पुढे जाताना शॉर्ट कट वापरु नका, कारण तो तुमच्या जीवनाला मारक ठरु शकतो. एकच पर्याय ठेवू नका. ध्येय हे नेहमी उंचावणारे असले पाहिजे. लक्ष्य केंद्रीत करुन ध्येय गाठा. जिल्हा प्रशासन, स्टडी सर्कल आणि समन्वय प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचे मिनी संमेलन ठाण्यात होत गेले, तर त्याचा फायदा येथील विद्यार्थ्यांना होईल अशी आशा कल्याणकर यांनी व्यक्त केली. मुरबाड, शहापूर, भिवंडीतील आदिवासी मुलांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी निधीची तरतूद केली असून मार्चपासून तो मिळण्यास सुरूवात होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी दीक्षित यांनीही मार्गदर्शन केले. संतोष पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) >दहा देशांत मुंबई विद्यापीठाच्या शाखामुंबई विद्यापीठाला १८ जुलैला १६० वर्षे पूर्ण होत आहे. अमेरिकेसह इतर देशांत विद्यापीठाच्या दहा शाखा पब्लिक युनिव्हर्सिटी अ‍ॅक्टनुसार सुरू होत आहे. अमेरिकेत विद्यापीठाच्या शाखेला जागाही मिळाली आहे. मुंबई विद्यापीठाची २५० एकर जागा आहे, त्यात १७ लाख चौरस फुटांवर विद्यापीठाचे बांधकाम झाले आहे. सव्वा कोटी चौरस फूट जागा शिल्लक आहे. त्यात बांधकाम करायचे असून त्याचा मास्टर प्लॅन तयार करीत आहोत. त्यासाठी तीन हजार कोटींच्या निधीची गरज असून ५०० कोटींचा निधी विद्यापीठाने तयार केला आहे. ठाणे व कळवा परिसरात १४ एकर भूखंडात स्त्रियांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे असे त्यांनी सांगितले.आशुतोष डुंबरे यांना आदर्श प्रशासक पुरस्कार आशुतोष डुंबरे यांना आदर्श प्रशासक पुरस्काराने दीक्षित यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना डुंबरे म्हणाले, पुरस्कार अनेक मिळतात; पण ते कोण देते आणि कोणाच्या हस्ते मिळतात हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील मुले स्पर्धा परीक्षेत पुढे येत आहेत हे श्रेय स्टडी सर्कलचे आहे. मनात न्यूनगंड न ठेवता या सेवेत या. लोकांची सेवा करण्याचे हे एक माध्यम आहे असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. >संमेलनाच्या ठरावातील मागण्यालोकसेवा आयोगासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावेमुख्यमंत्र्यांच्या इंटर्नशीप योजनेत एमपीएससी-यूपीएससीच्या उत्तीर्ण- अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना घ्यावेएमपीएससीची स्वतंत्र इमारत असावीशासनसेवेतील बरीचशी क्लास ३ पदे ही एमपीएससीमधून भरावी.