शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

एफटीआयआयमध्ये नाझी युगातील कँमेरा

By admin | Updated: March 17, 2017 02:17 IST

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीतील नाझी सैनिकांनी युद्धाचे फुटेज शूट करण्यासाठी एक कॅमेरा वापरला होता, याची माहिती खूप कमीजणांना अवगत असेल! ‘

पुणे : दुसऱ्या महायुद्धात जर्मनीतील नाझी सैनिकांनी युद्धाचे फुटेज शूट करण्यासाठी एक कॅमेरा वापरला होता, याची माहिती खूप कमीजणांना अवगत असेल! ‘बॅटल फील्ड कॅमेरा’ म्हणून नावाजला गेलेला ‘अँरिफ्लेस 35 टू ए ’ हा दुर्मीळ कॅमेरा आता सहजरित्या पाहायला मिळणे देखील कठीण आहे. पण कलात्मक शिक्षण देणा-या फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय)च्या कॅमेरा विभागात हे मॉडेल संग्रही ठेवण्यात आले आहे. भारतात या कॅमे-याच्या बी,सी या सिरीज उपलब्ध असल्या तरी ए सिरीजमधील हे एकमेव मॉडेल आहे. साधारणपणे १९३० च्या आसपास जर्मनीच्या अरनॉल्ड आणि रिचटर यांनी हा कॅमेरा निर्मित केला होता. त्या कॅमे-याला ‘अँरि’ हे नाव पडले. याचे वैशिष्टय म्हणजे हा कॅमेरा पोर्टेबल आणि लाईट वेट असल्याने सहजरित्या हाताळणे शक्य होते. या कॅमेरात जे शूट केले ते प्रत्यक्षात दिसते. हिटलरच्या काळात नाझी अधिका-यांनी दुस-या महायुध्दाचे डॉक्यूमेंटेशन करण्यासाठी याचा वापर केला होता. याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.गोल घुमटाचा ‘साऊंड’ इफेक्टआजच्या तुलनेत पूर्वीच्या काळी तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाही विविध क्लृप्त्या वापरल्या जात असत. याचेच उदाहरण म्हणून प्रभात कंपनीच्या काळात तयार करण्यात आलेला गोल घुमट आजही एफटीआयआयमध्ये लक्षवेधी ठरत आहे. प्रभातच्या काळातील साऊंड स्टुडिओ आजही कार्यरत आहे. साऊंडला इफेक्ट देण्यासाठी पूर्वी घुमट वापरला जायचा. घुमणारा आवाज हे या घुमटाचे वैशिष्टय. एखाद्या चित्रपटात व्हायोलिनसारख्या वाद्याचा वापर अथवा गायिकेच्या आवाजाला इफेक्ट देण्यासाठी घुमटातील प्रतिध्वनी वापरला जायचा. यामुळे आवाजात गोडवा निर्माण व्हायचा. आजकाल डिजिटल साऊंडचा वापर केला जातो. मात्र, पूर्वी साऊंड मिक्सरचे आऊटपुट घुमटामध्ये यायचे. घुमटाजवळ स्पीकर ठेवण्यात आला होता. या स्पीकरमधून ध्वनी निर्माण व्हायचा. घुमलेला आवाज मायक्रोफोनच्या सहाय्याने मिक्सरमध्ये जात असे. प्रभात कंपनीच्या १९४० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संत ज्ञानेश्वर’ या चित्रपटामध्ये घुमटाचा वापर केला होता. ज्ञानेश्वर श्लोक म्हणत म्हणत लहानाचे मोठे होतात, या प्रसंगातील श्लोकांचा आवाज घुमटामार्फत रेकॉर्ड करण्यात आला होता. १००-१५० ब्राम्हणांनी केलेल्या श्लोकपठणाचा प्रसंग रेखाटताना त्यांना दोन्ही स्टुडिओमधील मधल्या जागेत उभे करण्यात आले. तेथे ४ माईक लावण्यात आले होते. माईकमार्फत तो आवाजही घुमटामध्ये स्पीकरमध्ये घेण्यात आला. प्रसिद्ध वास्तूंचे माहितीदर्शक फलक ‘एफटीआयआय’ ही कलात्मक व ऐतिहासिक वास्तू चित्रपटांच्या शताब्दी काळाची साक्षीदार ठरली आहे. ‘शेजारी’ मधील लख लख चंदेरी हे गाणे असो किंवा संत तुकाराम’ मधील वैकुंठगमनाचा प्रसंग याच वास्तूमध्ये चित्रीत झाले आहेत, प्रभात स़्टुडिओ- संग्रहालय, व्ही शांताराम पॉंड, आवाजासाठी वापरण्यात येणारा गोल घुमट हा चित्रपटांचा अमूल्य खजिना याच वास्तूत पाहायला मिळतो.यासाठी या वास्तूच्या बाहेर फलक लावले जाणार असल्याचे एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी सांगितले.एफटीआयआयचा १८ व १९ मार्चला ‘ओपन डे’भारतीय चित्रपट सृष्टी व दूरचित्रवाणीला समृध्द करणारी रत्ने घडविणाऱ्या एफटीआयआयमध्ये पुन:श्च ‘एंट्री’ करण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. दि. 18 व 19 मार्चला ‘ओपन डे’च्या माध्यमातून या संस्थेची कवाडे सामान्यांसाठी खुली केली जाणार आहेत. पहिल्या दिवशी (18 मार्च) मूक बधीर विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे तर दुसरा दिवस सामान्य पुणेकरांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. सकाळी 10 ते 4.30 दरम्यान या गाईड टूर आयोजित करण्यात आल्या आहेत. मात्र यासाठी पूर्वनोंदणी करणे बंधनकारक आहे. उद्या (17 मार्च) आणि परवा (18 मार्च) या दिवशी सकाळी 11 ते 5 या वेळेत संस्थेत येऊन नोंदणी करावी अथवा ६६६.ा३्र्रल्ल्िरं.ूङ्मे/ङ्म१ॅ या संकेतस्थळावर आॅनलाईन नोंदणी देखील करता येणे शक्य आहे.