शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

विधान परिषदेसाठी मोर्चेबांधणी

By admin | Updated: October 20, 2016 01:13 IST

जिल्ह्यातील स्थानिक प्राधिकरणाच्या एका जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली

कोल्हापूर : जिच्याशिवाय हे विश्व अपूर्ण राहिले असते ती म्हणजे स्त्री. खरंतर एक स्त्री नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असते. अशाच ‘सामान्य ते असामान्य’ असा प्रवास करणाऱ्या आठ स्त्रियांच्या कर्तृत्वाला ‘लोकमत’तर्फे ‘सखी सन्मान अवॉर्ड’ देऊन सलाम करण्यात आला. या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक प्रिस्टीन वुमन्स हॉस्पिटल तर सहप्रायोजक प्राईड रिच टेक (इं) प्रा. लि. व चाटे शिक्षण समूह होते. केशवराव भोसले नाट्यगृहात मंगळवारी झालेल्या रंगारंग कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्णातील वेगवेगळ्या भागात भरीव काम करणाऱ्या, प्रसिद्धीपासून दूर राहून आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या आठ सखींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, प्रिस्टीन वुमन्स हॉस्पिटलचे डॉ. अजित पाटील, प्राईड रिच टेक (इं) प्रा. व्यवस्थापकीय संचालक अभिनंदन चौगले, संध्या कुंभारे, चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक प्रा. भारत खराटे, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक - संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. आशिष मिठारी यांनी तयार केलेल्या ‘सखी सन्मान सोहळा’ या शीर्षक गीताचे सादरीकरण झाले. दिपक बिडकर यांच्या रूद्रांश कला अकॅडमीच्या कलाकारांनी ‘रखुमाई...रखुमाई’ या नृत्यातून स्त्री शक्तीचे महत्त्व सांगितले. यावेळी यशस्वी कामगिरी करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या सोहळ्यात कलाकारांनी विविध नृत्याविष्कार सादर केले. त्यांनी ‘चक दे इंडिया...’, ‘बादल पे पाव हैं...’, ‘बच्चू सुनले जरा...’ , ‘आत्ताच बया का बावरलं...’ आदी गीतांवरील नृत्याविष्काराने उपस्थितांना खिळवून ठेवले. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या, आजवर अनेक पुरस्कार, मानसन्मान मिळाले; पण माझी जवळची माणसे तेव्हा सोबत नव्हती. कोल्हापूर हे माझे माहेर असून ‘घरच्या कौतुकाचा हा प्रसंग अवर्णनीय आहे’. अभिनेत्री काळे म्हणाल्या, ‘कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्यामुळे नाट्यक्षेत्रात तर चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांच्यामुळे चित्रपटक्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. जे काम मिळालं ते बरं करण्याचा प्रयत्न केला. त्यास रसिकांनी ‘चांगलं’ म्हटलं. हे प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत राहूद्या. ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटातील भूमिका माझ्या सोशिक प्रतिमेला आव्हान देणारी ठरली व तीच माझी आवडती भूमिका आहे. वाचनाच्या छंदाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, कथा, कादंबऱ्या तर मी वाचतेच, मात्र, लोकमत दररोज नियमित वाचते. लोकमतची मंथन पुरवणी मला विशेष आवडते. त्यातील विषय अतिशय चांगले व दर्जेदार असतात. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी प्रास्ताविकात ‘सखी मंच’च्या उपक्रमाची माहिती व सखी सन्मान अवॉर्डमागील भूमिका स्पष्ट केली. प्रिया देसाई यांनी आशा काळे यांच्या चित्रपटातील गीतांवर नृत्य सादर केले. डॉ. कविता गगराणी यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले. सरासरी आयुर्मान वाढलेडॉ. पाटील यांनी ‘वर्ल्ड मोनोपॉज डे’निमित्त उपस्थित सखींना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘भारतातील स्त्रियांचे सरासरी आयुर्मान स्वातंत्र्योत्तर कालखंडात वाढले असून सध्या ते ७६ पर्यंत पोहोचले आहे. वयाच्या चाळीशीनंतर येणाऱ्या मोनोपॉजसारख्या शारीरिक बदलांना सामोरे जाताना योग्य त्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास त्या काळातही जीवनाचा आनंद घेता येऊ शकतो.’ प्राईड रिच टेक विषयी..प्राईड रिच टेक च्या चौगले यांनी उपस्थितांना कंपनीविषयी माहिती दिली. ते म्हणाले,‘घरगुती उत्पादनांत आघाडीवर असणारी प्राईड रिच टेक कंपनी महिलांना आकर्षक बक्षीस योजनेच्या माध्यमातून व्यवसायाची एक नवी संधी उपलब्ध करून देत आहे. कंपनीतर्फे आज सवलतीच्या दरात बुकिंग सुरू असून महिलांना या माध्यमातून शून्य गुंतवणुकीद्वारे व्यवसायाची संधीही मिळत आहे. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह येथे मंगळवारी ‘लोकमत’तर्फे आयोजित ‘सखी सन्मान अवॉर्ड’सोहळ्यात दीपप्रज्वलन करताना ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे. यावेळी डावीकडून ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक प्रा. भारत खराटे, प्राईड रिच टेक कंपनीच्या संध्या कुंभारे, विभागीय व्यवस्थापक अभिनंदन चौगले, प्रिस्टीन वुमन्स हॉस्पिटलचे डॉ. अजित पाटील, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख उपस्थित होते. तर दुसऱ्या छायाचित्रात ‘लोकमत’तर्फे आयोजित ‘सखी सन्मान अवॉर्ड’ सोहळ्यात रुद्रांश कला अकॅडमीच्या कलाकारांनी नृत्याविष्कार सादर केला.