मुंबई : लोकल सेवा विस्कळीत होण्याच्या घटना सातत्याने मध्य रेल्वेची मेन लाइन आणि हार्बरवर घडत आहेत. सोमवारी संध्याकाळी ४ वाजता हार्बरवरील कुर्ला स्थानकात पनवेलकडे जाणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. ही लोकल जागीच थांबल्याने वाशी, पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेचा चांगलाच बोऱ्या वाजण्यास सुरुवात झाली. या लोकलमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात होते. हा बिघाड दुरुस्त करण्यास तब्बल पाऊण तास लागला. त्यानंतर ही लोकल वाशीला नेऊन रद्द करण्यात आली आणि पुढे सानपाडा कारशेडमध्ये नेण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे पाच लोकल रद्द करण्यात आल्या, तर १५ मिनिटे उशिराने लोकल धावत होत्या. त्याचा फटका काम आटोपून घरी परतणाऱ्या प्रवाशांना बसला.
पाऊण तास हार्बरचा खोळंबा कुर्ल्यात लोकलमध्ये बिघाड
By admin | Updated: December 23, 2014 03:13 IST