ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. १५ - नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेवर लाइन साफ करताना चार सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विषारी गॅसमुळे मृत्यू झाल्याचा आंदाज वर्तवण्यात येत आहे. हातात आलेल्या प्राथमिक माहीतीनुसार नागपूर जवळील इसासने गावात एका खाजगी सोसाइटीने कर्मचाऱ्यांना सेवर लाइन साफ करण्यासाठी बोलवले होते. लाइन साफ करण्यासाठी खाली इतरल्यानंतर त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे.
विषारी गॅसमुळे चार सफाई कामकारांचा मृत्यू
By admin | Updated: March 16, 2016 08:25 IST