राहुरी (अहमदनगर) : वांबोरी येथील तरुणाच्या धिंडप्रकरणी दाखल गुन्ह्यात पाच फरार आरोपींना रविवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि राहुरी पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले. शनिवारी २७ आरोपींविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. गावातील तणाव आता कमी झाला असून, रविवारी सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले असले तरी शीघ्रकृती दलाची तुकडी गावात तैनात आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी प्रेमप्रकरणातून गावातील व्यापाऱ्याच्या मुलाची विवस्त्र धिंड काढण्यात आली होती. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांना धीर दिला होता. रविवारी पोलिसांच्या पथकाने आरोपींना जेरबंद केले. (प्रतिनिधी)
तरुणाच्या धिंडप्रकरणी आणखी पाच जण जेरबंद
By admin | Updated: March 16, 2015 02:38 IST