अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च-एप्रिल २0१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अकोला येथील बाल शिवाजी शाळेची विद्यार्थिनी अवनी रामदास खोलतुंगे या विद्यार्थिनीने ४९६ गुण प्राप्त करून (९९.२0 टक्के) प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत अमरावती विभागातील पाचही जिल्ातून अकोला येथील बाल शिवाजी शाळेच्या अवनी खोलतुंगेने सर्वाधिक ४९६ गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. ९९.२0 टक्के गुण मिळविणार्या अवनीने संस्कृत आणि गणित या विषयात १00 टक्के गुण मिळविले. तिला भविष्यात आयएएस व्हायचे आहे. तिचे वडील रामदास खोलतुंगे हे नागपूर येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता असून,आई वैदेही अकोला येथील आरएलटी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. अमरावती विभागाचा निकाल ८४.११ टक्के लागला आहे. विभागातील पाच जिल्ात सर्वाधिक निकाल वाशिम जिल्ाचा लागला आहे. वाशिम जिल्ाचा निकाल ८८.0१ टक्के लागला आहे. बुलडाणा जिल्ाचा निकाल ८६.५८ असून, त्यापाठोपाठ ८३.८५ टक्के निकाल यवतमाळ जिल्ाचा लागला आहे. अमरावती जिल्ाचा निकाल ८२.५४ टक्के असून, अकोला जिल्ाचा निकाल ८0.७५ टक्के लागला आहे. विभागात एकूण १,६४,१0३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १,३८,0२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ७१,६४८ मुले आणि ६६,३७५ मुलींचा समावेश आहे.
अकोल्याची अवनी खोलतुंगे विभागातून प्रथम
By admin | Updated: June 17, 2014 20:23 IST