शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

महिलावर्ग करतो उत्सवाचे मॅनेजमेंट

By admin | Updated: August 15, 2016 03:19 IST

घराच्या चार भिंती ओलांडून महिलांनी समाजात विविध क्षेत्रात स्थान मिळविले.

रामेश्वर जगदाळे,

मुंबई- घराच्या चार भिंती ओलांडून महिलांनी समाजात विविध क्षेत्रात स्थान मिळविले. किंबहुना बऱ्याचशा क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. याच उक्तीचा आदर्श घेत काळाचौकी येथील आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पुढाकार घेत उत्सवाच्या मॅनेजमेंटची सूत्रे महिलांच्या हाती सोपविली आहेत. १९७० साली स्थापन झालेल्या या मंडळांचे यंदा ४७ वे वर्ष आहे. पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याकडे या मंडळाचा कल असतो. त्यामुळे दरवर्षी या मंडळाच्या वतीने प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी विशेष उपक्रमांची रेलचेल दिसून येते. >कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मॅनेजमेंट कायम पुरुषांकडे असते. मात्र आमच्या मंडळात हीच जबाबदारी महिलांचा समूह सांभाळतो. परंतु, या सगळ््यात पुरुष सहकारीही तितकीच मदत करतात. सगळ््यांच्या एकजूटीतून उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यावर अधिक भर असतो.- आकांक्षा गावडे, महिला अध्यक्षा>इकोफ्रेंडली सजावटवाढते प्रदूषण आणि आरास करण्यासाठी थर्माकोलचा होणारा वापर टाळण्यासाठी मंडळाच्या वतीने जास्तीत जास्त इकोफ्रेंडली सजावट करण्यात येते. त्यात मग कपडे, कागद यांचा अधिकाधिक वापर करण्यात येतो. शिवाय, सजावटींच्या वस्तूंचा पुनर्वापर होईल याची दक्षताही मंडळाकडून घेण्यात येते.>शिस्तबद्ध मंडळाचा सन्मानगेल्या काही वर्षात डीजेचा दणदणाट असो वा गणेशभक्तांची ओसंडून वाहणारी गर्दी या प्रकारांमुळे गणेश मंडळांवर टीकाही होऊ लागली. मात्र स्पर्धेच्या भाऊगर्दीत या मंडळाने २००८ आणि २००९ अशा सलग दोन वर्षी काळाचौकी पोलीस ठाण्याकडून ‘शिस्तबद्ध मंडळा’चा सन्मान मिळविला.>पारंपरिक खेळांची जोपासनामंडळाच्या वतीने गणेशोत्सवादरम्यान रात्रभर येथील उत्साही महिला पारंपरिक खेळांचे सादरीकरण करतात. त्यात फुगड्या, झिम्मा अशा लोप पावत चाललेल्या खेळांची जोपासना केली जाते.>सुवर्ण महोत्सवासाठी कार्यकर्त्यांची धडपडलवकरच मंडळांचे सुवर्णमहोत्सवी वर्ष येणार आहे, त्यासाठी येणारा आर्थिक भार हेरुन स्थानिकांनी स्वच्छेने निधी उभारण्याचे ठरविले आहे. त्यासाठी यंदापासून एक रुपयाची मदतही स्विकारण्याची तयारी असल्याचे खजिनदार तेजस मोजाड यांनी सांगितले.>वूमन ब्रिगेडगणेशोत्सवादरम्यान निघणाऱ्या मिरवुणकांमध्येही येथील विविध वयातील महिलांची आघाडी दिसून येते. शिवाय, या मिरवुणकांचेही व्यवस्थापन तरुणी आणि महिलांच्या खांद्यावर असते. मात्र तरीही ही वूमन ब्रिगेड कोणतेच भय न बाळगता हे सर्व कार्य पार पाडते.