शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

शेतकऱ्यांना उत्पादन खर्च!

By admin | Updated: March 28, 2017 03:38 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन त्रिस्तरीय धोरण आखत असून शेतकऱ्यांना उत्पादनखर्चाइतकी रक्कम

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन त्रिस्तरीय धोरण आखत असून शेतकऱ्यांना उत्पादनखर्चाइतकी रक्कम शासनाकडूनच देण्याचा विचार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी महसूलमंत्री पाटील यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. राज्यात कर्जमाफीच्या विषयावरून राजकारण तापले आहे. शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसही सरसकट कर्जमाफी द्या, यासाठी आग्रही आहेत; परंतु कर्जमाफी दिली म्हणजे आत्महत्या थांबतील, असे सरकारला वाटत नाही. त्यामुळे थेट सरसकट कर्जमाफी न देताही त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी काय करता येईल, असा विचार सरकार करत आहे. त्यानुसार एक त्रिस्तरीय धोरण आकार घेत आहे. त्याची टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी करण्याचा विचार सुरू आहे. शासनाच्या विचाराधीन असलेल्या त्रिस्तरीय धोरणांमुळे आता सतत काही तरी मागण्यांच्या भूमिकेत असलेल्या शेतकऱ्यामध्ये देण्याची क्षमता निर्माण होऊ शकेल, असा दावाही महसूलमंत्र्यांनी केला. एक लाख कोटींचे कर्ज कमी करणारराज्य शासनाच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी वर्षाला किमान एक लाख कोटींचे कर्ज कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील गळती पहिल्यांदा शोधली. आम्ही सर्व निविदा १५ ते १८ टक्क्यांने कमी स्वीकारल्या तरी कामाच्या दर्जामध्ये फरक पडत नसल्याचे लक्षात आले. याचा अर्थ डीपीआर वाढवला जात होता हे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)प्रस्तावित धोरण१ शेतकऱ्याचा उत्पादनखर्च वाढला आहे. त्यात नैसर्गिक आपत्ती आली तर त्याचा तो खर्चही उत्पादनातून निघत नाही. त्यासाठी उत्पादनखर्चाचा बोजा कमी करण्यासाठी सरासरी प्रत्येकी २५ हजार रुपये शासनानेच उपलब्ध करून द्यायचे. त्यासाठी १२ हजार ५०० कोटींची गरज लागू शकते.२ चांगल्या निविष्ठा, जलयुक्त शिवारमधून सिंचनाच्या सुविधा आणि शेतीतील नवे तंत्रज्ञान त्याच्या बांधावर पोहोचवून उत्पादन दुप्पट करण्याचा प्रयत्न होईल.३ चांगले उत्पादन आले आहे ; परंतु बाजारात दर पडल्यावरही शेतकऱ्याला त्याचा फटका बसतो. यासाठी शासन २२ प्रकारच्या कृषी उत्पादनांना हमी भाव देईल. ही शेती उत्पादने टाटासारख्या मोठ्या कंपन्यांशी करार करून प्रक्रिया करण्यासाठी त्यांनी विकत घ्यावीत असा प्रयत्न केला जाईल. त्यामध्ये फायदा झाला तर तो कंपन्यांचा असेल. नुकसान झाले तर त्याची जबाबदारी शासन घेईल. त्यासाठी अडीच हजार कोटी रुपयांची गरज लागेल असे शासनाला वाटते.कर्जमाफीवर दृष्टिक्षेपशासन वर्षाला १ लाख १४ हजार कोटी रुपये शेतीला कर्जपुरवठा शेतकऱ्यांचे ११ हजार कोटी रुपयांचे कर्ज आता थकीत.च्कर्जबाजारीपणामुळे गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्याची कोकणात एकही आत्महत्या नाही. पश्चिम महाराष्ट्रात ३४३, नागपूर विभागात ७५० तर उरलेल्या सर्व आत्महत्या मराठवाडा व अमरावती विभागात झाल्या आहेत. मग असे असेल तर सर्व राज्याला आणि सरसकट कर्जमाफी देण्याचा आग्रह कशासाठी, असे शासनाला वाटते.