शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

सायंकाळनंतर वाढला उत्साह

By admin | Updated: February 22, 2017 02:49 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. दुपारपर्यंत मतदारांचा उत्साह कमी दिसत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. दुपारपर्यंत मतदारांचा उत्साह कमी दिसत होता. अनेक केंद्र ओस पडली होती. दुपारी साडेचारनंतर मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. अनेक ठिकाणी रात्री साडेआठपर्यंत मतदान सुरू होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे अपवाद वगळता अनेक ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. उमेदवारांचे गुरुवारी जाहीर होणाऱ्या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. भोसरी : निवडणूक म्हटली की भांडण-तंटा, वादविवादाला कारण लागत नाही. काही ठिकाणी अटीतटीच्या लढती असूनही शिवाय भोसरी म्हणजे संवेदनशील तरीही निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी कोणत्याही वादावादीचा प्रकार घडला नाही.सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त मतदान करून घ्यायचे असा प्रयत्न सर्वच पक्षांकडून सुरू होता. भोसरी गावठाण, गवळीनगर, इंद्रायणीनगर या भागात प्रत्येक उमेदवारांनी प्रत्येक  पोलिंग बूथवर कार्यकर्त्यांची फौज  उभी केली होती. भोसरी गावठाण व गवळीनगर भागात राष्ट्रवादी व भाजपाचे कार्यकर्ते आमनेसामने उभे राहून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत होते. सकाळी पहिल्या दोन तासांत १५ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. सकाळी साडेनऊ ते दीड या दरम्यान चऱ्होली, मोशी, इंद्रायणीनगर, भोसरी व गवळीनगर भागातील बहुतांश बूथमध्ये मतदानाची आकडेवारी ४० टक्क्यांपर्यंत गेली होती. सर्वच बूथवर नागरिक चांगल्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडलेले पाहवयास मिळत होते. उमेदवारांनी मतदार राजाला खूश करण्यासाठी घरापासून प्रत्यक्ष बूथपर्यंत नेण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली होती. मात्र कोणत्याच उमेदवाराच्या रोषाला बाली पडायला नको या कारणावरून उमेदवारांच्या वाहनात बसण्यास टाळाटाळ केली. (वार्ताहर)गोंधळलेला मतदार : मतदानाला उशीर  सकाळी लवकर ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी आणण्याचा सपाटा बहुतांश सर्वच ठिकाणी लावलेला दिसत होता. ज्येष्ठ नागरिकांस अनेकांचा सुरुवातीला मतदान करताना गोंधळ उडत होता. प्रत्येकाला चार ठिकाणी मतदान केल्यावरच बीप असा आवाज येत असल्याने कोणती चार बटणे दाबायची असा प्रश्न उपस्थित केला जात होता. प्रत्येक कलरमधील एक बटण दाबा असे बहुतेक वेळा सांगणे भाग पडत होते. त्यामुळे मतदान प्रक्रियेस उशीर होत होता. सकाळी साडे सात ते साडे अकरा या वेळेत अनेक पोलिंग बूथवर गोंधळ सुरु होता. बालाजीनगरमध्ये बाचाबाची ४बालाजीनगर झोपडपट्टी भागात मतदानासाठी मतदारांना घेऊन जात असताना किरकोळ कारणावरून नगरसेविका सीमा सावळे, कार्यकर्ते व पोलिसांच्या मध्ये बाचाबाची झाली. अपंगासाठी व्हीलचेअर ४प्रत्येक प्रभागात अपंग व्यक्तींना आणण्यासाठी निवडणूक विभागाने व्हील चेअर पुरविल्या होत्या. मात्र काही उमेदवार मतदान होईपर्यंत अपंगांची खूपच सेवा करत असल्याचे चित्र दिसत होते. सकाळी साडे सात ते साडे अकरा या वेळेत अनेक पोलिंग बूथवर गोंधळ सुरु होता. मतदारांच्या रांगारहाटणी : सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रासमोर रांगा लावल्या होत्या. प्रभाग क्रमांक २२, २३ व २७ मध्ये सकाळी साडेनऊपर्यंत सुमारे १३ टक्के मतदान झाले होते. मात्र नेहमीपेक्षा मतदान करण्यासाठी मतदार घराबाहेर पडत असल्याने दुपारी दोन पर्यंत ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.येथील पालिका शाळा क्रमांक ५५ येथे प्रभाग क्रमांक २७ चे मतदान केंद्र होते. मात्र या प्रभागातील अनेकांचे नाव प्रभाग क्रमांक २८ मध्ये आल्याने मतदान कुठे करायचे याचीच माहिती नसल्याने मतदार नाव व मतदान केंद्र शोधत फिरत होते . मतदान केंद्राच्या बाहेर व्होटर स्लिप देण्यासाठी कोणतीही अत्याधुनिक सुविधा नसल्याने अनेक मतदारांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत होते. त्यामुळे उन्हात मतदार उभे राहून वैतागले होते. हीच परिस्थिती पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर विद्यालयात पाहावयास मिळाली. मतदारयादीत नाव शोधण्यासाठी मतदाराला मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे मतदार रांगेत उभे राहण्यासाठी कंटाळत होते.मतदान करण्यासाठी सकाळी ११पासून महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण-तरुणी, मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याने रहाटणी, काळेवाडी व पिंपळे सौदागर गावठाणात जत्रेचे स्वरूप आले होते. सर्वच मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतरावर सर्वच पक्षांचे बूथ लागले होते. (वार्ताहर)वाहन व्यवस्था४मतदार हा राजाच असतो याचा प्रत्यय आज चिंचवड परिसरात आला. प्रभागात व प्रभागाबाहेर असणाऱ्या मतदाराला मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी उमेदवारांनी विशेष वाहन व्यवस्था केल्याचे दिसत होते. प्रत्येक परिसरात मतदारांना रिक्षा व खासगी वाहनातून मतदानासाठी घेऊन जात होते. रिक्षामध्ये पाच ते सात जणांची ने-आण सुरू होती. मात्र वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत होते.४अनेक खासगी व प्रवासी वाहतूक करणारी वाहने मतदारांना सेवा देत असल्याचे दिसत होते. यामुळे मतदारांची खातिरदारी असल्याचे वास्तव परिसरात दिसून आले. अशा प्रकारामुळे रिक्षा स्टँड ओस असल्याचे चित्र सर्वच भागात होते. प्रवासी वाहतूक करणारी अनेक वाहने आज या कामात सकाळपासून धावत होती.मतदार संतप्त४मतदान प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अनेक मतदार घराबाहेर पडले.मात्र अनेकांना मतदान केंद्र कोठे आहे हे सापडत नव्हते. अनेक जण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत होते. मतदार ओळखपत्र असूनही यादीत नाव सापडत नसल्याचे अनेक प्रकार घडले. तर काहींच्या नावात बदल असल्याने ते चिंताग्रस्त होते.मतदार यादीत नाव शोधण्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.मात्र तिथे नाव सापडत नसल्याने अनेक मतदार संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत होते. ४प्रभाग पद्धतीमुळे अनेकांची नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याने अनेक मतदार धावपळ करीत होते.अनेक उमेदवारांनी मतदारांना मतदारयादीतील नाव शोधून देण्यासाठी यंत्रणा सज्ज केली होती.अपंगांची सोय४अनेक ठिकाणी तळमजल्यावरच मतदान केंद्र असल्याने अपंग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान करणे सुलभ झाल्याचे दिसून येत होते. सर्वच प्रभागांतील मतदान केंद्रावर मतदान पत्रिकेच्या घोळामुळे मतदारांना मतदान करताना बराच वेळ लागत होता. मतदान करायचे चार, मात्र मतयंत्रच दोन किंवा तीन असल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम होत होता. अनेक मतदार दोन यंत्रणेवरील एक एक बटण दाबून उभे राहात होते. मात्र, बीप आवाज न आल्याने मतदान झाले नाही असे केंद्रप्रमुखांना सांगावे लागत होते. पुन्हा बटण दाबा असे सांगितले जात होते. त्यामुळे यात बराच वेळ जात असल्याने काही प्रमाणात सर्वच मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या.उमेदवार दारात उभे ४सकाळी मतदानाला सुरुवात होताच अनेक मतदान केंद्रावर अगदी सकाळपासूनच मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवार हात जोडून उभे होते. लक्ष ठेवा, एकतरी द्या. कोणी पॅनल चालवा असे म्हणून मतदारांची मनधरणी करत होते. एसी गाडीच्या खाली न उतरणारे अनेक उमेदवार भर उन्हात लग्नाच्या मंडपात उभे राहिल्यासारखे उभे होते. चेहऱ्यावरून वाहणाऱ्या घामाच्या धारांची पर्वा न करता या केंद्रातून त्या केंद्राकडे पळापळ करीत होते. प्रभाग २२ मध्ये ५४ मतदान केंद्र होती. प्रभाग २३ मध्ये ३६ मतदान केंद्र होती, तर प्रभाग २७ मध्ये ४४ मतदान केंद्र होती. चोख पोलीस बंदोबस्त ४मतदान काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सर्वच मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदान केंद्रावर कामाशिवाय सोडले जात नव्हते. मतदान केंद्रापासून बऱ्याच अंतरावर विविध पक्षांच्या व उमेदवारांच्या समर्थकांना थांबविण्यात आले होते. मतदान करून एखादा मतदार परिसरात फिरत असेल तर त्याला लगेच बाहेर काढले जात होते.