शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
2
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
3
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
4
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
5
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
6
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
7
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
8
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
9
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
10
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
11
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
12
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
13
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
14
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
15
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
16
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
17
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
18
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
19
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
20
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!

प्रकल्पग्रस्त आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम

By admin | Updated: July 18, 2016 02:34 IST

गावठाणमधील घरांवर कारवाईविरोधात सोमवारी पुकारलेल्या बंदवरून तुर्भे येथे झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी भाजपासह सर्वपक्षीय नेत्यांना धारेवर धरले.

नवी मुंबई : गावठाणमधील घरांवर कारवाईविरोधात सोमवारी पुकारलेल्या बंदवरून तुर्भे येथे झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी भाजपासह सर्वपक्षीय नेत्यांना धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर बंदमधून माघार घेत असल्याचे सांगण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी ही बैठक आयोजित केली होती. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर अविश्वास दाखवत बंद होणारच अशा घोषणा केल्या. यावेळी इतर पक्षीय नेत्यांनी बंदला पाठिंबा दर्शवत भाजपाची कोंडी केली.गावठाणमधील प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर होत असलेल्या कारवाईच्या विरोधात भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी सर्वपक्षीयांना सोबत घेवून सोमवारी बंदची घोषणा केली होती. तुर्भे येथील होणाऱ्या कारवाईच्या अनुषंगाने आमदार म्हात्रे पालिका आयुक्तांच्या भेटीला गेल्या होत्या. यावेळी आयुक्तांनी त्यांना धुडकावून लावले होते. त्यानंतर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात हा लढा उभारण्यात आलेला आहे. परंतु आंदोलनापूर्वीच रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमदार मंदा म्हात्रे यांची बैठक झाली. या बैठकीत पावसाळ्यापुरती कारवाईला स्थगिती देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. ही माहिती प्रकल्पग्रस्तांपर्यंत पोहोचवण्याकरिता त्यांनी दुपारी तुर्भे येथे पत्रकार परिषद तसेच बैठक आयोजित केली होती. यावेळी उपस्थित प्रकल्पग्रस्तांनी मंदा म्हात्रे यांनाच धारेवर धरले. आंदोलनाची घोषणा करताना सर्वपक्षीयांना सोबत घेतले असताना, मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला त्या एकट्याच कशा गेल्या, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी उपस्थित काँग्रेस जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांनी देखील मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी भाजपा व मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली. तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी देखील मुंढे यांची प्रशंसा केलेली असल्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला. मंदा म्हात्रे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न करूनही प्रकल्पग्रस्तांमधील उद्रेक शांत झाला नाही. यावेळी इतकी वर्षे दुसरे मुख्यमंत्री होते, तेव्हा का कारवाया थांबल्या नाहीत, असा आमदार म्हात्रे यांनी उलट प्रश्न विचारताच वातावरण अधिकच तापले. अखेर नियंत्रणाबाहेर गेलेल्या जमावापुढे नमते घेत त्यांना बैठकीतून काढता पाय घ्यावा लागला.त्यानंतर सभागृहात उपस्थित १५० ते २०० च्या जमावाने त्या बैठकीवर ताबा घेतला. आम्हाला कोणत्याच राजकीय पक्षाची भूमिका इथे नको असून, केवळ प्रकल्पग्रस्तांची भूमिका हवी असल्याचे सांगत त्यांनी उपस्थित इतर सर्वपक्षीय नेत्यांनाही धारेवर धरले. त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच शाब्दिक चकमक उडू लागली. अखेर शिवसेनेच्या वतीने विठ्ठल मोरे, नामदेव भगत यांनी, काँग्रेसच्या वतीने दशरथ भगत यांनी तर राष्ट्रवादीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांना आंदोलनात पाठिंबा दर्शवला. (प्रतिनिधी)