शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
4
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
5
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
6
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
7
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
8
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
9
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
10
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
11
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
12
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
13
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
14
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
15
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
16
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
17
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
18
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
19
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
20
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

विक्रमगड तालुक्यात वीज गुल!

By admin | Updated: July 31, 2016 03:05 IST

मुसळधार पाऊस बरसत असल्याने त्याचा परिणाम म्हणून विक्रमगड परिसरात गेल्या दोन दिवसांमध्ये तब्बल २० तास वीज गायब होती.

विक्रमगड : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत असल्याने त्याचा परिणाम म्हणून विक्रमगड परिसरात गेल्या दोन दिवसांमध्ये तब्बल २० तास वीज गायब होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजता वीज गायब झाली ती रात्री १० वाजताच आली. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ६ वाजता वीज गायब झाली ती दुपारी 3 वाजताच आली. त्यामुळे यादरम्यान जवळजवळ २० तास वीज गायब होती तर पावसाळयात उपलब्ध वीज पुरवठयात सातत्य नसल्याने वारंवार वीज खंडीत होण्याचे प्रकारात भरमसाट वाढ झाल्याने महावितरणाच्या विरोधात वीज ग्राहकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे़दरम्यान, हे प्रकार होण्यामागे गेल्या अनेक वर्षाची जुनी असलेली वहन यंत्रणा व एका सेक्शन कार्यालयाची व कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता हे आहे. सध्या संपूर्ण तालुक्याचा भार हा एकच कार्यालयावर असून त्यामध्येही अवघे ७ ते ८ कर्मचारी काम करीत असल्याने सर्व ठिकाणी वेळेवर पोहचून सेवा देणे शक्य होण्यासारखे नाही़ त्यातच जुनी यंत्रसामुग्रीने वारंवार बिघाड होत असते़ येथे नवीन अजून एक सेक्शन कार्यालयाची निर्मिती व्हावी, अशी मागणी होत आहे़काही भागात रात्रभर वीज गायब असते तर काही भागात विजेचा पुरेसा दाब नसल्याने ती डिम असते़ सद्यस्थितीत गेल्या काही दिवसांपासून मिनिटाला वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असतात, त्यातच दुरुस्तीच्या नावाखाली आठवडयातील दर शुक्रवारी वीज बंद ठेवली जाते़ दिवभर वीज बंद ठेवून महावितरण कोणती कामे करतात? कामे करतात तर मग असे प्रकार का घडतात? असा सवालही उपस्थित केला जात आहे़विक्रमगड तालुक्यातील वीजेची समस्या सोडविण्यासाठी तालुका निर्मीतीनुसार २६ जानेवारी २००९ रोजी महावितरण उप विभागीय कार्यालय (उप कार्यकारी अभियंता) सुरु करण्यांत आले़ परंतु त्यामध्ये देण्यात आलेला कर्मचारी वर्ग हा खुपच अपुरा असल्याने व या कार्यालयामध्ये तालुका निर्मितीपासूनच सुविधांचा अभाव असल्यामुळे येथील वीज ग्राहकांना सुविधा पुरवितांना उपलब्ध कर्मचारी वर्गावर मोठा ताण पडत असून त्याना एकप्रकारे तारेवरची कसरतच करावी लागत असते. तसेच त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र गेल्या अनेक वर्षापासून पाहावयास मिळत आहे़विक्रमगड शहरातील २५ हजार व तालुक्यातील २५ हजार अशा ५० हजार वीज ग्राहकांसाठी अवघे ८ कर्मचारी असल्याने वीज समस्या कायम आहे़ त्यामुळे येथील उपविभागीय कार्यालय हे नुसते नावापुरते असल्याचा आरोप वीज ग्राहक करीत आहेत़विक्रमगड शहरातील ओंदे वीजकेंद्रातून साखरा, विक्रमगड व आलोंडा असे तीन ट्रान्सफार्मर व त्याअंतर्गत गाव खेडयापाडयांना वीज पुरविली जाते़ हा संपूर्ण तालुका आदिवासी असल्याने व त्यातील वीज यंत्रणा सुधारणे व पुरवठा वाढविणे यासाठी स्वतंत्र निधी मिळणे शक्य असूनही तसे प्रयत्न मात्र होत नाहीत. त्याचा फटका जनतेला बसतो आहे. (वार्ताहर)>अशी आहे दुरवस्था यंत्रणेचीएल टी लाईन १३०० कि़ मी च्यावर,एस टी लाईन ३८० कि़ मी़ व ३३ के़ व्ही ४० कि ़मी असल्याने विक्रमगड हा दुर्गम व जंगल पटटयाचा भाग असल्याने पावसाळयात या लाईनमध्ये अथवा ट्रान्सफार्मरमध्ये काही बिघाड झाल्यास वीज खंडीत होण्याचे प्रकार घडत असतात़ महावितरणाच्या विक्रमगड शाखेतंर्गत असलेल्या २५ हजार वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी केवळ ८ कर्मचारी असून त्यांच्याकडून ग्राहकसेवांची अपेक्षा पूर्ण होत नसल्याने तर या कर्मचाऱ्यांना पावसाळयात वीजेची समस्या जटील होत असल्याने तीन फिडरची लाईन ब्रेक झाल्यास त्याची दुरुस्ती करण्यास या कर्मचाऱ्यांचे हाल होत असल्याने कर्मचारी संख्या तत्काळ वाढविण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे़