ठाणो : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधल्या मंत्रीपदाचा ठाण्याचा लाल दिवा तूर्तास हुकला असला तरी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाल्याने या सरकारच्या काळातील पहिला लाल दिवा ठाण्याला बुधवारी प्राप्त झाला. गेल्या पाच दिवसांपासून याबाबत लोकमतने सातत्याने दिलेली सर्व वृत्ते सत्य ठरली आहेत. त्यांच्या रूपाने एका शेतकरी पुत्रचा आणि कडव्या शिवसैनिकाचा व ठाणोकराचा बहुमान झाला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ठाण्याला प्रथमच लाभले आहे.
एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून ठाणो जिल्ह्यात सर्वाधिक मते आणि मताधिक्य घेऊन दुस:यांदा विजयी झाले आहेत. 2क्क्9 च्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी ते विजयी झाले होते. 2क्क्5 च्या विधानसभा निवडणुकीत ते ठाणो शहर मतदारसंघातून विजयी झाले होते. अशा रूपाने त्यांची आमदारकीची हॅट्ट्रिक या वेळी झालीच होती. त्यावर आता विरोधी पक्षनेतेपदाचा ताज चढला आहे. ठाणो जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुखपद, जिल्हा संपर्क प्रमुखपद, आमदारपद आणि विरोधी पक्षनेतेपद अशी महत्त्वपूर्ण पदांची बाउंड्री मारणारे ते पहिले शिवसैनिक ठरले आहेत. शिवाय, त्यांचे पुत्र श्रीकांत हे कल्याणचे खासदार आहेतच. सलग चार वर्षे ठाणो महापालिकेचे सभागृह नेते होण्याचा बहुमानही त्यांनी प्राप्त केला आहे. शाखाप्रमुख ते विरोधी पक्षनेतेपद असा प्रवास त्यांनी केला आहे. एकेकाळी रिक्षा चालविणारे, एका कंपनीत नोकरी करणारे व नंतर लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसाय करणारे एकनाथ शिंदे यांचा हा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. घरात कोणतीही राजकीय अथवा नेतृत्वाची पाश्र्वभूमी नसतानाही त्यांनी हे यश मिळविले आहे. किसननगर-2 मध्ये त्यांनी शिवसेनेची पहिली शाखा उघडली होती. पहिले पद शाखाप्रमुखाचे त्यांनी भूषविले होते. आनंद दिघे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत पाईक अशी त्यांची प्रतिमा होती. शिवसेनेची सूत्रे उद्धवजींकडे गेली तरी त्यांची ही प्रतिमा कायम राहिली. दिघेंच्या नंतर ठाण्याचा शिवसेनेचा गड सांभाळणार कोण, या यक्षप्रश्नाचे उत्तर एकनाथ शिंदेंनी आपल्या कर्तृत्वाने दिले. आजही अनेक जण त्यांच्या संयमी आणि मितभाषी व्यक्तिमत्त्वाला विधानसभेची विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी पेलवेल काय, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. परंतु, आलेल्या प्रत्येक जबाबदारीचे शिवधनुष्य लीलया पेलायचा त्यांचा स्वभाव पहाता ते ही जबाबदारीही तितक्याच प्रभावीपणो व सहजपणो पार पाडतील, यात ठाणोकरांना तरी कोणतीही शंका नाही.
महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात शिवसेनेने मनोहर जोशी, नारायण राणो, रामदास कदम असे तीन विरोधी पक्षनेते दिलेत. आता त्यापेक्षाही सरस कामगिरी पार पाडण्याची संधी शिंदे यांना लाभली आहे. शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार, हा प्रश्नच शिवसेनेत निर्माण झाला नाही. कारण, हे पद एकनाथ शिंदे यांना मिळणार, हे उद्धवजींनी आधीच स्पष्ट केले होते. शिवसेनेच्या अंतस्थ वतरुळात अशी चर्चा होती की, गेल्या विधानसभेच्या कार्यकाळातच शिवसेनेचे गटनेतेपद सुभाष देसाई यांच्याकडून काढून घेऊन ते शिंदे यांना देण्याचा निर्णय झाला होता. तसे बॅनर्सही तयार झाले होते. परंतु, कुठे तरी माशी शिंकली आणि तो बेत प्रत्यक्षात येऊ शकला नाही. बहुधा, गटनेते कशाला, विरोधी पक्षनेतेच व्हा, असा संकेत नियतीने त्यांच्या भाळी रेखाटला असावा. म्हणूनच तो बेत अर्धवट राहिला असावा, असे आता ठाणोकरांना वाटते.
(विशेष प्रतिनिधी)
4शिवसेना जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार आणि आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अशी पदांची बाउंड्री
4ठाणो आणि पालघर जिल्ह्यांतील चारही लोकसभा मतदारसंघांत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीच्या चारही विद्यमान खासदारांना पराभूत करून तिथे महायुतीचे खासदार विजयी करण्याची अनोखी कामगिरी
4मोदीलाट असतानाही जिल्ह्यातील 18 पैकी सहा विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी केले.