शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

मद्य पिण्याचे वय एकच करा

By admin | Updated: April 9, 2017 03:11 IST

देशभरात केवळ महाराष्ट्रात मद्य पिण्याचे वयात तफावत आहे. त्यामुळे कायद्याचे सर्रास उल्लंघन केले जाते, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. याविषयी, इंडियन मेडिकल

मुंबई : देशभरात केवळ महाराष्ट्रात मद्य पिण्याचे वयात तफावत आहे. त्यामुळे कायद्याचे सर्रास उल्लंघन केले जाते, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. याविषयी, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या युथ विंग अध्यक्ष असणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवाय, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याविषयी लेखी निवेदन देऊन त्याद्वारे मद्य पिण्याचे वय एकच असावे, अशी मागणी केली आहे.महाराष्ट्रात वाइनसाठी १८ वर्षे, बीअरसाठी २१ वर्षे आणि मद्यसेवनाकरिता २५ वर्षे अशी तरतूद आहे. मात्र हे वयाचे निकष कोणत्याही विचाराविना लावण्यात आल्याचे डॉ. मुंदडा यांचे म्हणणे आहे. वाइनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण बीअरपेक्षा अधिक असते. मात्र कायद्यातील तरतुदी या मद्यसेवनाला प्रोत्साहन देत आहेत, या गंभीर विरोधाभासाकडे मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी लेखी निवेदन देण्यात आले आहे. शिवाय, सर्व प्रकारच्या मद्यसेवनाकरिता २५ हेच वय असावे; आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी केली जावी याकरिता उच्च न्यायालयातही याविषयी याचिका दाखल करण्यात आली असून, लवकरच यावर सुनावणी होईल.डॉ. मुंदडा यांनी सांगितले की, मद्यसेवनाकरिता असलेले २५ वर्षे वयाचे बंधन महाराष्ट्रात कुठेही पाळले जात नाही. सर्रासपणे सर्वच ठिकाणी याविषयी कायदे धाब्यावर बसविले जातात. त्यामुळे सध्याच्या कायद्याचा काहीच उपयोग नाही, त्यात महत्त्वाच्या सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे लेखी निवेदन, याचिका याप्रमाणेच लवकरच या विषयावर लोकसहभाग घेऊन जनजागृतीपर अभियान राबविण्याचा मानसही ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. गेल्या काही वर्षांत वाइन पिण्याचे प्रमाणही वाढत चालले असल्याची माहिती डॉ. मुंदडा यांनी दिली.(प्रतिनिधी) २५ वर्षे वयाचे बंधन पाळले जात नाही- मद्यसेवनाकरिता असलेले २५ वर्षे वयाचे बंधन महाराष्ट्रात कुठेही पाळले जात नाही. सर्रासपणे सर्वच ठिकाणी याविषयी कायदे धाब्यावर बसविले जातात. त्यामुळे सध्याच्या कायद्याचा काहीच उपयोग नाही, त्यात महत्त्वाच्या सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे लेखी निवेदन, याचिका याप्रमाणेच लवकरच या विषयावर लोकसहभाग घेऊन जनजागृतीपर अभियान राबविण्याचा मानसही ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. गेल्या काही वर्षांत वाइन पिण्याचे प्रमाणही वाढत चालले असल्याची माहिती डॉ. मुंदडा यांनी दिली.