शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

रेवडीचा कढीपत्ता लंडनच्या बाजारात

By admin | Updated: January 16, 2016 00:35 IST

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सातारा : ५० गुंठ्यात कष्टाने फुलवले सेंद्रिय रान -- गुड न्यूज

प्रगती जाधव-पाटील -- सातारा --भारतीय जेवणामध्ये सर्रास आढळणारा आणि जीवनसत्त्वांनी युक्त असलेला रेवडीचा सेंद्रिय शेतीतील कढीपत्ता मजल-दरमजल करत चक्क लंडनपर्यंत पोहोचला आहे. एसटीतील नोकरी सांभाळून पत्नी आणि बहिणीच्या मदतीने हणमंत कुचेकर यांनी ही शेती फुलविली.रेवडी या गावात हणमंत शंकर कुचेकर यांची वडिलोपार्जित शेती आहे. पूर्वी सर्वांच्याच सल्ल्याने या शेतात वेगवेगळी पिके घेतली जात होती. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांनी मित्राची कढीपत्त्याची शेती पाहिली आणि त्यांनी या पिकाकडे वळण्याचा निर्णय घेतला. धारवाड कृषी विद्यापीठाशी संपर्क साधून साताऱ्यातील रगाडे बापू यांच्याकडून त्यांनी कढीपत्त्याची रोपे मिळविली. कुचेकर यांनी ५० गुंठ्यात १ टनाहून अधिक उत्पन्न घेतले. त्यावेळी त्यांनी कढीपत्त्याची पाने मुंबईच्या एका व्यापाऱ्याला कवडीमोल भावात विकले. ‘आत्मा’ने त्यांना रोपांची काळजी, काटणी यापासून विपणन अशा सर्व पातळ्यांवर मदत केली. पारंपरिक कढीपत्त्याची पाने विकण्यापेक्षा प्रक्रिया करून त्याची पावडर केली तर उत्पन्नात वाढ होईल, असा सल्ला पणनतज्ज्ञ सायली महाडिक यांनी दिला. ‘आत्मा’कडून सवलतीत ‘सोलर ड्रायर’ घेऊन त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली. दर तीन महिन्यांनी कढीपत्त्याची कापणी होते. त्यांची पत्नी कांचन आणि बहीण संजीवनी या दोघीही दिवसाला दहा किलो कढीपत्त्याची पावडर करतात. शेतातून पाने कापून आणून ती सोलर ड्रायरमध्ये वाळवून मग त्याची पावडर करण्यात येते. ही आहेत औषधे  --५० गुंठ्याच्या आपल्या शेतातील पिकाचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी दशपर्णी अर्क, जीवामृत आणि शेणखताचा वापर करतात.एवढे लागते पाणी --कढीपत्त्याच्या रोपाची मुळे खूप लवकर खोलवर रूजतात. त्यामुळे याला फारसे पाणी लागत नाही. कुचेकर यांच्या शेताला कालव्यातून पाणी मिळते. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी शेताला पाणी पाजले होते. त्यावर अद्यापही त्यांनी शेतात पाणी धरलेले नाही.मुंबई, पुणे अन् आता लंडन --कुचेकर यांनी कढीपत्त्याची पाने पहिल्यांदा मुंबईच्या बाजारात विक्रीस पाठविली. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील एका कंपनीत पाने विकली. त्यानंतर पुण्यातील काही मॉलमध्ये त्यांनी कढीपत्ता पावडर विक्रीस ठेवली आणि आता सातासमुद्रापार लंडनला त्यांची पावडर जाणार आहे.उत्पन्नात अशी होते वाढ सध्या बाजारात कढीपत्त्याची पाने वीस ते तीस रुपये किलो दराने विकली जातात. जर ही पाने ड्रायरमध्ये वाळवून त्याची पावडर करून पिशवीबंद केली तर ही पावडर २० रुपये ५० ग्रॅम दराने विकली जाते. कढीपत्ता शेती पारंपरिक पद्धतीने करण्यापेक्षा त्यात आधुनिकतेची जोड देण्याचा आम्ही प्रयत्न केला. कुचेकर यांनीही त्याला साथ दिली. शासनाच्या सर्व आयात निर्यात निकषांवर खरे उतरल्यानंतर त्यांचा कढीपत्ता आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाणार आहे. - गणेश घोरपडे, प्रकल्प संचालक, आत्मा, सातारा.अनेक खाचखळग्यातून कढीपत्ता शेतीचा प्रवास झाला. पण जेवढ्या अडचणी अधिक तेवढेच यश मोठे या मताचा मी आहे. संकटावर मात करून मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यामुळे माझ्या गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेता आले.- हणमंत कुचेकर, शेतकरी, रेवडी, सातारा